मुंबई- विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये अशिलाला भेटण्यासाठी गेलेल्या वकिलाला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी विक्रोळी बार असोसिएशनच्या वकिलांनी आज विक्रोळी न्यायालय ते विक्रोळी पोलीस ठाणे असा शांती मोर्चा काढला आहे.
वकील अनिकेत यादव हे पोलीस ठाण्यामध्ये आपल्या अशिलाला भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान, येथे यादव यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मारहाण करून त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे, या घटनेच्या निषेधार्थ आज शेकडो वकिलांनी विक्रोळी न्यायालय ते विक्रोळी पोलीस ठाणे असा शांती मोर्चा काढला आहे.
हेही वाचा- पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजीच्या शिक्षकांची वानवा; तर मराठी शिक्षकांवर येणार 'संक्रात'