ETV Bharat / city

ShivSamvad Yatra: आदित्य ठाकरे यांची राज्यभरात शिवसंवाद यात्रा ; भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर, शिर्डी दौरा - राज्यभरात शिवसंवाद यात्रा

शिवेसेनेला नवी भरारी देण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ( Yuva Sena chief Aditya Thackeray ) यांच्या मुंबईतील निष्ठा यात्रेनंतर राज्यभरात शिवसंवाद यात्रा ( Aditya Thackeray ShivSamvad Yatra ) काढणार आहेत. सेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोरांच्या मतदारसंघातून येत्या गुरुवारपासून शिव संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे

ShivSamvad Yatra
शिवसंवाद यात्रा
author img

By

Published : Jul 20, 2022, 4:31 PM IST

मुंबई - शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी सुरू झाल्याने राज्यातील शिवसैनिकांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. काही भागात शिवसैनिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवसैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आदित्य ठाकरे ( Yuva Sena chief Aditya Thackeray ) हे राज्यभरात शिवसंवाद यात्रा काढणार ( Shiv Samvad Yatra across the state ) आहेत. बंडखोरांच्या मतदारसंघातून यात्रा निघणार असून स्थानिक पातळीवर भर देणे शिवसेनेला आव्हानात्मक असणार आहे.

भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी या भागात दौरा - एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता १२ खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. कधी नव्हे ते शिवसेनेचे आतापर्यंतचे सर्वात मोठे राजकीय नुकसान झाले आहे. त्यामुळे शिवेसेनेला नवी भरारी देण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील निष्ठा यात्रेनंतर राज्यभरात शिवसंवाद यात्रा काढणार ( Shiv Samvad Yatra across the state ) आहेत. सेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोरांच्या मतदारसंघातून येत्या गुरुवारपासून शिवसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी या भागात दौरा करणार आहेत. बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.

कार्यकर्त्यांना पक्षबांधणीसह टिकविण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार - बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे जिल्हा पातळीवर कट्टर शिवसैनिक विरुद्ध शिंदे गटाचे सैनिक असे दोन गट आता हिंदुत्वाच्या विचाराने पुढे येणार आहेत. शिंदे गटाकडून आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला जातो आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे स्पष्ट होईल. तसेच सरकार किती दिवस चालणार हे नक्की होईल. परंतु, बंडखोर नेत्यांकडून थेट शिवसैनिकांना आव्हान दिले जात असल्याने, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पक्षबांधणीसह टिकविण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. गावोगावी, गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखांसह कार्यकर्ते तयार करण्याचे आव्हान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समोर असणार आहे.

मुळात एकनाथ शिंदे यांची बंडखोरी सर्वसामान्य शिवसैनिकांना पटलेली नाही. अशातच नेता वर्ग शिंदे गटात दिवसेंदिवस सामील होत आहेत. शिवसैनिकांची यामुळे द्विधा मनस्थिती झाली आहे. शिंदे गटाकडे आता सत्ता आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कट्टर राहणार की सत्तेचा मागे धावणार यावर ही शिवसेनेचे पुढील समिकरणे ठरणार आहे. तसेच ज्या बंडखोराला मंत्रिपद मिळतील ते शिंदे गट जिल्ह्यात अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करतील. मात्र कट्टर शिवसैनिकांना बळ देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यस्तरावर किती प्रयत्न करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पुढची निवडणूक ही शिवसेनेसाठी आव्हानात्मक असली तरी मोठी संधी - कोकण आणि मुंबई हे शिवसेनेचे बालेकिल्ले असले तरी मराठवाडा-विदर्भात आपला पाया मजबूत करावा लागणार आहे. जिल्ह्यात शिवसेना रुजविताना ज्या पद्धतीने शिवसेनेचे गल्लोगल्ली, गावोगावी शाखांचे फलक दिसत होते. त्या स्वरूपाची रचना नव्याने आखावी लागेल. बदलत्या राजकारणा नुसार कट्टर शिवसैनिकांना कोण वाली ठरणार, त्याचा उपयोग किती होणार यावर सेनेचे भवितव्य ठरणार आहे. यासाठीच बाळशिवाजी यांच्याप्रमाणे तळागाळातून शिवसेनेची पुनर्बांधणी आणि पुन्हा नवे शिवसैनिक घडवण्याची धडपड करावी लागणार आहे. मात्र पुढची निवडणूक ही शिवसेनेसाठी आव्हानात्मक असली तरी मोठी संधीही असेल, असे मत राजकीय विश्लेषक श्रीरंग सुर्वे वर्तवतात.

हेही वाचा : Aditya Thackeray criticism : 'गद्दार हा गद्दारच असतो', आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.