ETV Bharat / city

अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबीच्या चौकशीसाठी गैरहजर - Arjun Rampal to be questioned

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपाल याने एनसीबी चौकशीसाठी हजर होण्यासाठी २१ डिसेंबरची वेळ मागून घेतलेली आहे. मात्र अर्जुन रामपालचा ठावठिकाणा कुठे आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान अर्जुन रामपाल कडून आलेल्या विनंती बाबत एनसीबीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Actor Arjun Rampal to be questioned again by NCB
अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबीच्या चौकशीसाठी गैरहजर
author img

By

Published : Dec 16, 2020, 10:15 AM IST

Updated : Dec 16, 2020, 11:58 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला अमली पदार्थ तस्करीप्रकरणी एनसीबीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते. यानुसार अर्जुन रामपालला आज १६ डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर व्हायचे होते. मात्र वैयक्तिक अडचणीमुळे तो चौकशीसाठी हजर होऊ शकलेला नाही. यासंदर्भात एनसीबी अधिकाऱ्यांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अर्जुन रामपाल एनसीबीच्या चौकशीसाठी गैरहजर

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपाल याने एनसीबी चौकशीसाठी हजर होण्यासाठी २१ डिसेंबरची वेळ मागून घेतलेली आहे. मात्र अर्जुन रामपालचा ठावठिकाणा कुठे आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान अर्जुन रामपालकडून आलेल्या विनंतीबाबत एनसीबीने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बॉलिवूडमध्ये असलेले ड्रग्स सिंडिकेट प्रकरण एनसीबीकडून तपासले जात असताना बऱ्याच जणांना या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे.

''माझ्या घरात जे औषध मिळाले आहे, त्याचे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे''

याआधी ११ नोव्हेंबरला अर्जून रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. त्यावेळी अमली पदार्थप्रकरणी अर्जुनची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. ''माझे अमली पदार्थांच्या संदर्भात काहीही घेणे देणे नाही. माझ्या घरात जे औषध मिळाले आहे, त्याचे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे, तसेच ते एनसीबीला दिले आहे'', अशी प्रतिक्रिया अर्जुनने माध्यमांशी बोलताना दिली होती.

पॉलच्या घरी सापडले होते अमली पदार्थ -

अर्जुनचा मित्र पॉल बार्टल यालाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरू आहे. याच प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव पुढे आले होते. पॉल बार्टल हा अभिनेता अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे, असे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. अमली पदार्थ तस्करी संदर्भात आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांना अटक झाली आहे. पहिली अटक अर्जुनच्या प्रेयसीचा भाऊ एगिसलोस डेमेट्रिएड्सला झाली होती. अर्जुनची प्रेयसी गेब्रियल डीमेट्रीवेजची चौकशी करण्यात आलेली होती.

निर्माता फिरोज नाडियादवालाच्या पत्नीला जामीन -

याआधी एनसीबीने बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या घरी सुद्धा छापा मारला होता. ज्यामध्ये फिरोजची पत्नी शबाना सईदकडून दहा ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर फिरोज नाडियावालाच्या पत्नीलाही अटक केली होती. न्यायालयाने तिला पंधरा हजारांचा जामीन मंजूर केला आहे. फिरोज नाडियादवाला यालासुद्धा यासंदर्भात चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

हेही वाचा - भारताचा वेगवान गोलंदाज श्रीशांतला 'या' संघात मिळाले स्थान

Last Updated : Dec 16, 2020, 11:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.