ETV Bharat / city

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासह नानावटी रुग्णालयात दाखल - ऐश्वर्या राय बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Actor Aishwarya Rai Bachchan and his daughter aaradhya admitted at Nanavati Hospital
मुलगी आराध्यासह अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल
author img

By

Published : Jul 17, 2020, 10:18 PM IST

Updated : Jul 17, 2020, 10:31 PM IST

मुंबई - अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐश्वर्याला हलका ताप आल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ऐश्वर्या आणि आराध्या या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, आज (शुक्रवार) ऐश्वर्याला हलका ताप आला असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अगोदरच ऐश्वर्या राय बच्चनचे सासरे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि तिचे पती अभिषेक बच्चन यांनाही कोरोना झाला असल्याने, उपचारासाठी नानावटी रुग्णालयातच दाखल केले आहे.

हेही वाचा - राज्यात सलग तिसऱ्या दिवशी ८ हजाराहून अधिक कोरोनारुग्ण, २५८ मृत्यूंची नोंद

दिनांक 13 जुलै रोजी बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बिग बी आणि अभिषेक हे पुढील उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल झाले होते. तर, ऐश्वर्या आणि आराध्या यांनी होम क्वारंटाईन होऊन घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, घरी राहूनही दोघींच्या तब्येतीत फारसा फरक पडला नाही. त्यामुळे नाईलाजाने या दोघीही नानावटी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

Last Updated : Jul 17, 2020, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.