ETV Bharat / city

Achievements75 आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे, पाहा तो प्रवास - आशिया खंडातील पहिली रेल्वे प्रवास

इंग्रज सरकारच्या काळात १८४४ मध्ये मुंबईचे आद्यशिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांनी आगगाडी (ट्रेन) सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला इंग्रज सरकारने मान्यता दिली. मुंबईमधील बोरीबंदर ते ठाणे अशी रेल्वे १८५३ मध्ये धावली.

first railway
first railway
author img

By

Published : Aug 11, 2022, 10:23 PM IST

मुंबई भारतावर दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले. यावेळी त्यांनी आपला वायपर वाढवण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या. इंग्रज सरकारच्या काळात १८४४ मध्ये मुंबईचे आद्यशिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांनी आगगाडी (ट्रेन) सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला इंग्रज सरकारने मान्यता दिली. मुंबईमधील बोरीबंदर ते ठाणे अशी रेल्वे १८५३ मध्ये धावली. आशिया खंडातील ही पहिली रेल्वे आहे.

पहिल्या रेल्वेसाठी प्रयत्न सप्टेंबर १८३० मध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मँचेस्टर या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकरशेट यांना समजली आणि त्यांनी अशी गाडी आपल्या शहरातही हवी, असा ध्यास घेतला. मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना पहिल्यांदा नानांनी त्यांचे मित्र जमशेटजी जिजिभोय यांच्याकडे मांडली. या दोघांनी मिळून १८४५ साली ‘इंडियन रेल्वे असोसिएशन’ची स्थापना केली. या माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजवू लागले. ३१ ऑक्टोबर १८५० रोजी ब्रिटिशांनी मान्य करून त्यानंतर ब्रिटिश सरकारने 'ग्रेट इंडियन पेनिंन्सुल' (जी.आय.पी) या कंपनीला मुंबईपासून ते खानदेशाच्या दिशेने ५६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट दिले होते. १६ एप्रिल १८५३ आशिया खंडातील पहिली रेल्वे ३.३५ वाजता भारतात मुंबई बोरीबंदर ते ठाणे अशी धावली. पहिल्या रेल्वेच्या शुभारंभासाठी ब्रिटिशांनी ४०० नागरिकांना निमंत्रण दिले होते. या पहिल्या रेल्वे प्रवाशांमध्ये नामदार यार्डली, जज्ज चार्लस् जॅकसन् तसेच जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ ही यांचा समावेश होता.

first railway
आशिया खंडातील पहिली रेल्वे

रेल्वेसाठी तीन महाकाय राक्षसी इंजिन १६ एप्रिल १८५३ हा दिवस म्हणजे त्यावेळच्या भारतीयांसाठी एक चमत्कार होता. बैल - घोडया सारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा त्या काळी नागरिकांसाठी वेगळा अनुभव होता. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी आशिया खंडातील आणि भारतातील पहिली रेल्वे धावली त्यावेळी ती १४ डब्यांची होती. या डब्यांना खेचण्यासाठी सिंधू, सुलतान आणि साहिब हे तीन महाकाय राक्षसी इंजिन जोडण्यात आले होते. ही रेल्वे सुरु झाली त्यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती. मुंबई ते ठाणे अंतर कापण्यासाठी तब्बल ५७ मिनिट लागले होते. पहिल्यांदाच घोडे बैलां विना गाडी धावत होती. अनेकांनी तर या गाडीला बघून नारळ फोडले तर काहींनी लोटांगण घालून नमस्कार केला आणि काही नागरिकांनी या घटनेमुळे महामारी येईल अशी अफवा सुद्धा पसरविली होती अशी इतिहासत नोंद आहेत.

त्याच वेळी सुटते आशियातील पहिली गाडी १६ एप्रिल १८५३ या दिवशी पहिली रेल्वे दुपारी ३.३५ वाजता धावली. तेव्हा पासून रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. रेल्वे गाड्यांचे डबे, इंजिन यात बदल होत गेले. १९२५ मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. त्या रेल्वे गाडीची वेळ रेल्वेकडून आजही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते ठाणे याच स्थानकांसाठी राखून ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे त्याची दक्षता रेल्वेकडून घेतली जाते.

भारतीय रेल्वेचे जनक सप्टेंबर १८३० मध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मँचेस्टर या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकरशेट यांना समजली आणि त्यांनी अशी गाडी आपल्या शहरातही हवी, असा ध्यास घेतला. मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना पहिल्यांदा नानांनी त्यांचे मित्र जमशेटजी जीजीभॉय यांच्याकडे मांडली. या दोघांनी मिळून १८४५ साली ‘इंडियन रेल्वे असोसिएशन’ची स्थापना केली. या माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजवू लागले. त्याचाच परिपाक म्हणजे, १ ऑगस्ट १८४९ रोजी ‘द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे’ (GIP रेल्वे) ची स्थापना झाली. त्यांच्या अथक प्रयत्नांतून १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा Achievements 75 Year महिला डॉक्टर बनली बॉडी बिल्डर जागतिक स्तरावर कमवले नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.