मुंबई- उमेश कोल्हे हत्यातील आरोपीला आर्थर रोड कारागृहात मारहाण झाल्याची सूत्रांनी माहिती दिली ( accused beaten in Arthur Road Jail ) आहे. शाहरूख पठाण या आरोपीला मारहाण झाली आहे. आर्थर रोड कारागृहातील पाच कैद्यांकडून मारहाण झाली आहे. आर्थर रोड ( Arthur Road Jail ) कारागृहमधील सर्कल क्रमांक 11 तील बराक क्रमांक 2 मध्ये आरोपी शाहरुख पठाणला मारहाण झाली आहे. मारहाण करणाऱ्या कैदीन विरोधात तुरुंगाची शांतता भंग करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या मुक्तव्याला अमरावतीतील उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर समर्थन दर्शवल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडी ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाण वर कारागृहातील इतर कैद्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
उमेश कोल्हे प्रकरणात अटक झाल्याचे समजतात कैद्यांनी केली मारहाण-शाहरूख पठाण व इतर कैदी आर्थर रोड तुरुंगात बोलत होते. त्यावेळी कोणाला कोणत्या कारणावरून अटक झाली याबाबत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटक झाल्याचे पठाणने सांगितले. त्यावेळी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण चव्हाण ऊर्फ आवन व संदीप जाधव या आरोपींनी पठाणवर हल्ला केला. त्यामुळे नुपूर शर्मा वक्तव्याचा वाद आता देशातील अतिसंवेदनशील अशा आर्थर रोड कारागृहपर्यंत पोहोचला आहे.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा -आर्थर रोड कारागृह येथील सर्कल क्रमांक 11 मधील बराक क्रमांक 2 मध्ये हा वाद झाला आहे. याबाबतची माहिती तुरुंग सुरक्षा रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पठाणला इतर आरोपींपासून वेगळे केले. पठाणच्या हाताला व गळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारागृह रुग्णालयातच उपचार करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने पठाणवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिक ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. तुरुंग अधिकारी अमोल चौरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 143, 147, 149, 323 अंतर्गत तुरुंगाची शांतता भंग करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शनिवार (दि.23) जुलै रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी मंगळवारी (दि.26) रोजी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उमेश कोल्हे प्रकरणात हे आहेत आरोपी- अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार इरफान खान याचाही समावेश आहे. आरोपी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी एनआयएने ताब्यात घेतले होते.
5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी- भाजपचे माजी प्रवक्ता नुपूर शर्मा ( Former BJP Spokesperson Nupur Sharma ) यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू मोहम्मद पैगंबर विरोधात वक्तव्य केले होते. याला समर्थन करणारे पोस्ट करणारे ( Umesh Kolhe ) अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयए 7 आरोपींना अटक करण्यात ( NIA Arrested 7 Accused ) आली होती. सर्व आरोपींची ( NIA ) एनआयए कोठडी संपत असल्याने सर्वाना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
आरोपींचे दहशतवादी संघटनेशी संबंध : एनआयएने कोर्टात म्हटले आहे की, या आरोपींचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे अनेक पुरावे तपासादरम्यान सापडले आहेत. सध्या आरोपींची कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. या संदर्भात खुलासा करता येणार नाही. मात्र, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो याकरिता या सर्व आरोपींना 7 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात दहशतवादी संघटनेची संबंधित UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण : नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.
हेही वाचा-Umesh Kolhe Murder Case : धमकी मिळालेल्या तक्रारदाराच्या घराची रेकी; अमरावती पोलीस सतर्क