मुंबई - राज्यात सपा नेते अबू आझमी ( SP leader Abu Asim ) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवर हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या आदेशाला विरोध ( Abu Azmi opposition to Vande Mataram ) केला आहे. शासनाचा हा आदेश चुकीचा ठरवून फेटाळण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण ( Hindu Muslim Controversy ) व्हावी, यासाठी भाजपने ( BJP ) जाणीवपूर्वक असा आदेश काढला आहे, असे ते म्हणाले. अबू आझमी म्हणाले की, आमचे देशावर प्रेम आहे. मात्र, आम्ही फक्त अल्लाहसमोर माथे टेकवतो, कुणासमोरही नाही आहे. आम्ही वंदे मातरम् म्हणण्याला विरोध असून आम्ही कधीच वंदे मातरम् म्हणणार ( Abu Azmi opposition to saying Vande Mataram ) नसल्याचे ते म्हणाले.
वंदे मातरम् म्हणण्याचे आदेश - गांधी जयंतीपासून महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना फोनमध्ये हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे आदेश दिले आहेत. यावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, तुम्ही नेहमी बाळासाहेबांप्रमाणे 'जय महाराष्ट्र' म्हणता, मग आता भाजप, आरएसएसच्या दबावाखाली येऊन जय महाराष्ट्र बोलणे सोडले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'जय महाराष्ट्र' म्हणणे हा देशद्रोह आहे का? असे ते शिंदे सरकारला म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हम सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा, जय हिंद बोलते यातून कुठेही देशाविरुद्ध द्वेष दिसून येतो का? जे खरे मुस्लिम असतील ते कधीच अल्लाशिवाय कोण्यात्याही देवाकडे आपले डोके टेकवणार नाही. यात कोणता देशद्रोह दिसतो तुम्हाला असे खडे बोल त्यांनी शिंदे सरकारला सुणावले.
ऑगस्टमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांनी निवेदन जारी केले होते - महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १४ ऑगस्ट रोजी हा आदेश जारी केला होता. ज्यामध्ये राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना कार्यालयात फोन उचलताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणणे बंधनकारक करण्यात आले होते. मुनगंटीवार म्हणाले की, नमस्कार सारखे शब्द परकीय आहेत. म्हणून, हे शब्द टाकून देणे आवश्यक आहे. वंदे मातरम हा केवळ एक शब्द नसून प्रत्येक भारतीयाची भावना असल्याचे ते म्हणाले.