ETV Bharat / city

Aarey Car Shed No further Tree Cutting Required:'आरे कारशेड'साठी आणखी झाडे तोडण्याची गरज नाही - किरीट समैया

author img

By

Published : Jul 16, 2022, 9:48 AM IST

भाजप नेते किरीट सोमैया यांनी आरे कारशेडवरुन आज ट्विट करुन नवीन प्रश्न उपस्थित केले. तसेच कारशेडसाठी आणखी झाडे कापण्याची गरज नसल्याचेही सोमैया यांनी स्पष्ट केले आहे. वनशक्ती एनजीओवर त्यांनी टीका केली आहे.

किरीट समैया
किरीट समैया

मुंबई - आरे कारशेडसाठी यापुढे आणखी झाडे कापण्याची गरज नसल्याचे भाजप नेते किरीट सोमैया यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी वनशक्तीवरही संशय व्यक्त केला आहे.

वनशक्तीचा खटाटोप कशासाठी - वनशक्ती एनजीओने कारशेडसाठी खासगी बिल्डर 'रॉयल ​​पाम'च्या जमिनीची शिफारस का केली, असा सवालही उपस्थित केला आहे. रॉयल पामला ₹4800 कोटी TDR/FSI चा फायदा कशासाठी असा प्रश्न त्यांनी ट्विट करुन विचारला आहे.

आरे कारशेडसाठी आणखी झाडे तोडण्याची गरज नाही

आणखी झाडे तोडण्याची गरज नाही - 'आरे कारशेड' यापुढे झाडे तोडण्याची गरज नाही. 30 हेक्टर आरेची जमीन कारशेडसाठी वापरली आहे. उच्च न्यायालयाने आरे कारशेड योजना मंजूर केली आहे. मागील 31 महिन्यांत कारशेड काम रखडले आहे. हे काम आता मार्गी लागेल अशी सोमैया यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर काही तासात लगेचच आरे (Aarey Forest Argument) मधील मेट्रो-3 च्या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचे आदेश दिले होते. यामुळे पुन्हा एकदा आरे जंगलात वाद झाडे तोडण्याचा वाद पुन्हा पेटला आहे. नविन सरकारच्या या निर्णया विरोधात आरे येथील पिकनिक पॉईंट जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत आवाज उठविला होती. माजी पर्यावरण मंत्री व आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray joined the agitation in this Aarey) देखील या आरेतील आंदोलनात सहभागी घेतला होता. त्यांचा आरेतील मेट्रो कारशेडला विरोध पहिल्यापासून आहे.

आम्हाला मुंबईतील ही जैवविवीधता वाचवायची आहे: यासंदर्भात बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “या नवीन सरकारला आमच्याबद्दल काही राग किंवा नाराजी असेल तर त्यांनी ती मुंबईकरांवर काढू नये. आरेची लढाई ही मुंबईची लढाई आहे, ती आपल्या देशाच्या, आपल्या जंगलांसाठीची लढाई आहे. आम्ही सरकारमध्ये असताना या आरेतील 808 एकर इतका परिसर जंगल घोषित केला. महानगरातील जैवविविधता वाचवण्यासाठी या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास बिबट्या वारंवार दिसतो. आरेशी संबंधित विरोध हा केवळ 2,700 हून अधिक झाडे वाचवण्यासाठी नाही. तर हा जैवविविधतेशी संबंधित विषय आहे. आम्हाला मुंबईतील ही जैवविवीधता वाचवायची आहे.” अशी प्रतिक्रिया युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आरे मुंबईचं फुफ्फुस: आरेच्या हे 1,800 एकर वनक्षेत्र 'मुंबईचे फुफ्फुस' म्हणून ओळख जाते. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास 300 प्रजातींचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडलेले आहे. इथं मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोक शनिवार रविवारी स्वच्छ प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मते, जंगले केवळ शहरातील लोकांना ताजी हवा देत नाहीत. तर वन्यजीवांसाठी एक प्रमुख स्थानिक अधिवास देखील आहेत. या जंगलात सुमारे पाच लाख झाडे असून अनेक नद्या आणि तलाव येथून जातात.

2014 पासून आरे वादात : आरेमध्ये मेट्रो-3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव प्रथम 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. ज्याला स्थानिक एनजीओ वनशक्तीने, मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर फडणवीस यांनीही हाच प्रस्ताव पुढे केला. मात्र कारशेडसाठी आरेतील झाडे तोडण्यास कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. मग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कारशेडसाठी कांजूर मार्ग निवडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कांजूर मार्गाऐवजी आरे कॉलनीत कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राज्याचे महाधिवक्ता आणि प्रशासनाला दिले.

हेही वाचा - Explanation by Uday Samant : 'जे झालं ते जोडण्याचा प्रयत्न कोणीही करत नव्हता...', उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.