मुंबई - राज्यात कोरोना नियंत्रणात आला असून, आज दिवसभरात केवळ 973 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 12 रुग्ण दगावले आहेत. तर सक्रिय रुग्ण देखील 8 हजार इतके असून, अडीच हजार ठणठणीत बरे झाले आहेत, असा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनचे 62 रुग्ण सापडले असून, सर्व रुग्ण पुणे भागातील आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
राज्यात कोरोना चांगलाच आटोक्यात आला आहे. आज रुग्ण संख्या एक हजार पेक्षा खाली आहे. दिवसभरात 973 रुग्णांची नोंद झाली असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची टक्केवारी 1.82 टक्के इतकी स्थिरस्थावर आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.1 टक्के आहे. दिवसभरात 2 हजार 521 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 77 लाख 7 हजार 254 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
८ हजार सक्रिय रुग्ण
कोविडचे निदान करण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 76 लाख 58 हजार 977 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.13 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 63 हजार 623 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 800 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 746 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 8 हजार 688 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रॉनचे 62 रुग्ण
ओमायक्रॉनचे आज 62 रुग्ण सापडले. त्यापैकी पुणे मनपा हद्दीत 60, पुणे ग्रामीण भागातील 2 संसर्ग बाधित आहेत. आजपर्यंत 4 हजार 629 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 4456 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 9382 जणांची जनुकीय चाचणी केली. 8333 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून, 1049 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण
मुंबई महापालिका - 128
ठाणे - 9
ठाणे मनपा - 21
नवी मुंबई पालिका - 23
कल्याण डोबिवली पालिका - 9
मीरा भाईंदर - 2
वसई विरार पालिका - 6
नाशिक - 23
नाशिक पालिका - 16
अहमदनगर - 44
अहमदनगर पालिका - 13
पुणे - 76
पुणे पालिका - 206
पिंपरी चिंचवड पालिका - 63
सातारा - 13
नागपूर मनपा - 26