ETV Bharat / city

'बेस्ट'..! ९५ टक्के कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, ३ महिन्यांत ३८७ कर्मचारी बाधित

author img

By

Published : Apr 12, 2021, 8:22 AM IST

बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात. त्यांचा फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश केला आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत बेस्टच्या ४० हजार पैकी २४ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.

 ९५ टक्के कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात
९५ टक्के कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

मुंबई - शहर व उपनगरात गेल्या दोन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचवेळी मुंबईत बेस्टमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. गेल्या तीन महिन्यांत बेस्टचे तब्बल ३८७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर सुरूवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या ३१५० कर्मचाऱ्यांपैकी ३००४ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. ५ टक्क्यांहून कमी प्रमाणात पॉझिटिव्ह येणे हे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चांगले प्रमाण आहे.

५ टक्क्यांहून कमी पॉझिटिव्ह -

मुंबईची सेकंड लाईफलाईन समजली जाणाऱ्या बेस्टकडून परिवहन सेवा दिली जाते. कोरोना काळात ट्रेन बंद असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्टने केले. तेव्हापासून आतापर्यंत बेस्टचे सुमारे ३१५० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यापैकी ९५ टक्के म्हणजेच ३००४ कर्मचाऱ्यांनी कोरोनावार मात केली आहे.

जानेवारी २०२१ नंतर एप्रिलपर्यंत बेस्टच्या ९ हजार कर्मचारी, बस चालक व वाहक यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३८७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५ टक्के पेक्षा कमी कर्मचारी हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह येणे हे प्रमाण चांगले नियंत्रण मानले जाते, असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

२४ हजार कर्मचाऱ्यांना लस -

बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात. त्यांचा फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश केला आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत बेस्टच्या ४० हजार पैकी २४ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. त्यापैकी ९ हजार कर्मचाऱ्यांना लसीची दुसरा डोसही देण्यात आला असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.