ETV Bharat / city

75 Years of Independence : स्वातंत्र्य चळवळीचा ऐतिहासिक वारसा असलेला 'मणि भवन'; वाचा, सविस्तर... - मणि भवन मुंबई

महात्मा गांधींच्या वास्तव्याने ( Father of The Nation Mahatma Gandhi ) पावन झालेल्या अनेक वास्तू देशात आहे. यात मुंबईतील मणि भवन ( Mani Bhavan in Mumbai ) या वास्तूचाही समावेश होतो.

75 Years of Independence
75 Years of Independence
author img

By

Published : Feb 12, 2022, 6:04 AM IST

मुंबई - देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्याने ( Father of The Nation Mahatma Gandhi ) पावन झालेल्या अनेक वास्तू देशात आहे. यात मुंबईतील मणि भवन ( Mani Bhavan in Mumbai ) या वास्तूचाही समावेश होतो. 1917 ते 1934 अशा दीर्घ कालावधीत महात्मा गांधींचा मणि भवन या वास्तुशी संबंध राहिला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सुरूवातीचा महत्वाचा कालखंड असल्याने यादरम्यान झालेल्या अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार मणि भवन राहिले आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक वारसा मणि भवन
  • अनेक महत्त्वाच्या बैठकांचा साक्षीदार मणि भवन

असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा या आंदोलनांसंदर्भातील महत्वाच्या बैठका मणि भवनमध्येच पार पडल्या आहेत. पंडित नेहरूंसह देश-विदेशातील अनेक मोठे नेते गांधीजींना याच ठिकाणी भेटायला यायचे. या वास्तूच्या दुसऱ्या मजल्यावर गांधीजी राहायचे. स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनदरम्यान ४ जानेवारी १९३२ ला पहाटे याच इमारतीच्या गच्चीवरून गांधीजींना इंग्रजांनी अटक केली होती. २७ आणि २८ जून १९३४ ला काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही येथे घेण्यात आली. विशेष म्हणजे मणि भवनमध्ये वास्तव्यास असतानाच महात्मा गांधींच्या पेहरावात बदल झालेला आहे आणि याच ठिकाणी गांधीजी चरखा चालवायलाही शिकले.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : शहाजहांची मुलगी जहांआराने वसवलाय 'हा' चौक, वाचा सविस्तर...

  • गांधी स्मृती संग्रहालय म्हणून ओळखले

मणि भवन हे मुंबईतील गावदेवी येथे वसलेले आहे. सध्या मणि भवन हे गांधी स्मृती संग्रहालय म्हणून ओळखले जाते. इथे गांधीजींचा जीवनपट मांडणारे फोटो, त्यांचे कपडे, चरखा अशा गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत. याशिवाय गांधीजी राहायचे ती खोलीही त्या वेळेस होती तशीच ठेवण्यात आली आहे. मणि भवनच्या तळ मजल्यावर महात्मा गांधींशी संबंधित सुमारे 50 हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे. यातील काही पुस्तके स्वतः महात्मा गांधींनी वाचलेली आहेत. याशिवाय मणि भवनमध्ये महात्मा गांधींच्या जीवनावर आधारीत गांधी थॉट्स हा अभ्यासक्रम सध्या चालवला जातो. यात अनेकांनी पीएचडीही केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे मणि भवन संग्रहालय बंद असले तरी जेव्हा हे संग्रहालय सुरू असते तेव्हा वर्षभरात सुमारे चार लाख लोक इथं भेट देतात. या वास्तूला भेट देणारा प्रत्येक जण गांधी विचारांनी भारावून गेल्याशिवाय राहत नाही.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : 'या' क्रांतिकारकाच्या पिस्तूलचे नाव होते 'बमतुल बुखारा', वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.