ETV Bharat / city

Mumbai Elevator Collapsed : मुंबईत 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू

मुंबईतील ग्रॅटरोड बलराम स्ट्रीट येथील एका इमारतीची लिफ्ट कोसळली ( Mumbai Elevator Collapsed ) आहे. त्यात एकाचा मृत्यू आणि एक जखमी झाला ( Mumbai Elevator Collapsed One Death ) आहे.

author img

By

Published : Mar 14, 2022, 8:35 PM IST

Updated : Mar 14, 2022, 9:14 PM IST

accident
accident

मुंबई - मुंबईतील ग्रॅटरोड बलराम स्ट्रीट येथे मोठी दुर्घटना घडली आहे. सिद्धीज्योती या 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली ( Mumbai Elevator Collapsed ) आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असता एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाने दिली ( Mumbai Elevator Collapsed One Death ) आहे.

एकाचा मृत्यू, एक जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रॅटरोड बलराम स्ट्रीट येथे सिद्धीज्योती ही तळ अधिक ४० मजली इमारत आहे. या इमारतीत दुरुस्ती करण्याचे काम सुरू असताना ही लिफ्ट ४० व्या मजल्यावरून खाली कोसळली. सायंकाळी ४.४० वाजता ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अभिनव त्रिपाठी ( २६ ) आणि सुर्यकांत पुजारी (४३) जखमी झाले होते. दोघांनाही जी.टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सुर्यकांत पुजारी या जखमीचा रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

दरम्यान, या घटनेची स्थानिक पोलीस, अग्निशमक दलाचे अधिकारी चौकशी करत असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले. तर लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती डी वॉर्डाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा - BMC Issue Notice Narayan Rane : पंधरा दिवसांत बांधकाम हटवा, पालिकेची नारायण राणेंना नोटीस

Last Updated : Mar 14, 2022, 9:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.