मुंबई - मुंबईतील शिवशाही परिसरात गेल्या ४ वर्षांपासून परवाना नसताना औषधोपचार करणाऱ्या सुकेश गुप्ता या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यात संबंधित व्यक्तीने सांगितले, की तो 12 वीच्या परीक्षेत नापास झाला होता आणि दररोज सुमारे 50 रुग्णांवर तो उपचार करत होता. या कारवाईत त्याच्याकडून औषधे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अशी झाली कारवाई
बीएमसी पी नॉर्थच्या आरोग्य विभागात कार्यरत महिला अधिकारी डॉ. कुसुम गुप्ता यांना या बोगस डॉक्टरांसंदर्भात माहिती मिळाली. आरोपी सुकेश गुप्ता हा गेल्या ४ वर्षांपासून कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय शिवशाही परिसरात दवाखाना चालवत असल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. डॉ. कुसुमने दिंडोशी पोलिसांकडे तक्रार केली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी त्यांच्या चमू आणि बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करत बोगस डॉक्टर सुकेश गुप्ता याला दवाखान्यात ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत सुकेश गुप्ता हा बारावी नापास असल्याचे उघडकीस आले. शिवाय तो गेल्या ४ वर्षांपासून औषधोउचार करत असल्याचे माहिती पोलीस तपासात पुढे आली. तो दररोज 50 रुग्णांवर उपचार करत असल्याचेही या चौकशीत स्पष्ट झाले.
हेही वाचा - Nitesh Rane Criticized BMC : मुंबई पालिकेचे केवळ दोन ते तीन घरांवरच लक्ष - नितेश राणे