ETV Bharat / city

कामोठ्यात 4 लाखात बाळाची विक्री करणाऱ्या एक डॉक्टर व तीन महिलांना अटक - Kamothe Navi Mumbai

बाळाची चार लाखात विक्री करणार्‍या डॉक्टर व तीन महिलांना कामोठे पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. कामोठे सेक्टर 8 मधील फॅमेली हेल्थ केअर असे क्लिनिक चालवणारा डॉक्टर एका लहान बाळाची 4 लाखाला विक्री करणार असल्याची माहिती, कामोठे पोलीस ठाणेला मिळाली होती.

4 including mother arrested by Kamothe police for trying to sell child
कामोठ्यात 4 लाखात बाळाची विक्री करणाऱ्या एक डॉक्टर व तीन महिलांना अटक
author img

By

Published : Nov 4, 2021, 2:45 PM IST

नवी मुंबई - कामोठ्यात एका नवजात तान्ह्या बाळाची अवघ्या चार लाखात विक्री करणाऱ्या डॉक्टर व तीन महिलांच्या कामोठे पोलिसांनी मूसक्या आवळल्या आहेत. या तिन्ही महिला तळोजा येथील होत्या.

बाळाची चार लाखात विक्री करणार्‍या डॉक्टर व तीन महिलांना कामोठे पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
चार लाखात झाला बाळाचा सौदा -बाळाची चार लाखात विक्री करणार्‍या डॉक्टर व तीन महिलांना कामोठे पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अटक केलेल्या डॉक्टरचे कामोठ्यात स्वतःचे क्लीनिक आहे.पंकज पाटील असे या डॉक्टरचे नाव आहे. पंकज पाटील यांनी मुलगी असलेल्या तान्ह्या बाळाचा अवघ्या चार लाखात सौदा करून बाळाची विक्री केली होती. सध्या हा डॉक्टर कामोठे पोलिसांच्या ताब्यात आहे.कामोठे सेक्टर 8 मधील फॅमेली हेल्थ केअर असे क्लिनिक चालवणारा डॉक्टर एका लहान बाळाची 4 लाखाला विक्री करणार असल्याची माहिती, कामोठे पोलीस ठाणेला मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार,पोलिसांनी डॉक्टरला अटक करण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक मंथन पाटील, खाजगी पंच या बाळाची खरेदी करण्यासाठी डॉक्टर पंकज पाटील यांच्या दवाखान्यात गेल्या. त्यावेळी डॉक्टर पाटील यांनी सांगितलेली 4 लाखाची रक्कम देखील सोबत घेऊन गेल्या. पैसे दाखवून त्यांनी बाळाची विचारणा केली. त्यावेळी डॉक्टरने रक्कम पाहून बाळाला विकणार्‍या महिलेला फ़ोन केला आणि क्लीनिकमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार तळोजामध्ये राहणार्‍या तीन महिला मुलगी असलेल्या लहान बाळाला घेऊन त्या क्लीनिकमध्ये आल्या. ठरलेल्या व्यवहारानुसार डॉ पंकज पाटील यांनी पैसे घेतले आणि बाळ स्वाधीन केले. मंथन पाटील यांना बाहेर जाण्यास सांगितले. या वेळी विक्रीसाठी आलेल्या महिला बाळाला देऊन बाहेर पडल्या व क्लीनिकच्या बाहेर सापळा रचलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक महाला यांच्या पथकाने या महिलांना व डॉक्टरला अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.