मुंबई - आज राज्यात 3611 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 60 हजार 186 वर पोहचला आहे. तर आज 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 489 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.83 टक्के तर मृत्यूदर 2.5 टक्के आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून महाराष्ट्रात कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत आघाडीवर राहिला आहे. गेल्या अकरा महिन्यात महाराष्ट्र्रात 20 लाख 52 हजार 905 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
आज 1,773 रुग्ण बरे होऊन परतले घरी -
राज्यात आज 1,773 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 74 हजार 248 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 52 लाख 72 हजार 826 नमुन्यांपैकी 20 लाख 60 हजार 186 नमुने म्हणजेच 13.49 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 75 हजार 418 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 33 हजार 269 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र एक नंबरवर-
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून महाराष्ट्रात कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत आघाडीवर राहिला आहे. गेल्या अकरा महिन्यात महाराष्ट्र्रात 20 लाख 52 हजार 905 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये 9 लाख 88 हजार 655 रुग्ण असून केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 9 लाख 44 हजार 57, आंध्रप्रदेशमध्ये 8 लाख 88 हजार 692, तामिळनाडूमध्ये 8 लाख 43 हजार 690, दिल्लीमध्ये 6 लाख 36 हजार 529, उत्तर प्रदेशमध्ये 6 लाख 1 हजार 898, पश्चिम बंगालमध्ये 5 लाख 72 हजार 32 एकूण रुग्ण आहेत.
मृतांच्या संख्येतही महाराष्ट्र आघाडीवर -
देशभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एकूण 51 हजार 415 मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये 12 हजार 402, कर्नाटकमध्ये 12 हजार 251, दिल्लीमध्ये 10 हजार 886, पश्चिम बंगालमध्ये 10 हजार 225 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिझोराममध्ये 9 तर दादरा नगर हवेलीमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. लक्षद्वीपमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
रुग्ण बरे होण्याच्या संख्येत महाराष्ट्र एक नंबरवर -
रुग्ण बरे होण्याच्या संख्येत महाराष्ट्र एक नंबरवर आहे. महाराष्ट्रात 19 लाख 70 हजार 053 रुग्ण बरे झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 9 लाख 25 हजार 829, केरळमध्ये 9 लाख 20 539, आंध्रप्रदेशमध्ये 8 लाख 80 हजार, तामिळनाडूमध्ये 8 लाख 26 हजार 994, दिल्लीमध्ये 6 लाख 24 हजार 592, उत्तर प्रदेशमध्ये 5 लाख 89 हजार 882, पश्चिम बंगालमध्ये 5 लाख 57 हजार 494 रूग्ण बरे झाले आहेत.