मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी २७४०, मंगळवारी ३५३०, बुधवारी ३७८३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यात आज गुरुवारी १६ सप्टेंबरला किंचित घट होऊन ३५९५ रुग्ण आढळून आले आहेत. आज ४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३२४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा - यंत्रमाग घटकांना ऑनलाइन अर्जास 2 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
राज्यात ४९,३४२ सक्रिय रुग्ण -
राज्यात आज दिवसभरात ३२४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २० हजार ३१० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३५९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ३२२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६५ लाख २९ हजार ८८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ११ हजार ५२५ (११.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८९ हजार ४२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४९ हजार ३४२ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार -
२६ ऑगस्टला ५१०८, ३० ऑगस्टला ३,७४१, ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४, ९ सप्टेंबरला ४२१९, १० सप्टेंबरला ४१५४, ११ सप्टेंबरला ३०७५, १२ सप्टेंबरला ३६२३, १३ सप्टेंबरला २७४०, १४ सप्टेंबरला ३५३०, १५ सप्टेंबरला ३७८३, १६ नोव्हेंबरला ३५९५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.
मृत्यूदर २.१२ टक्के -
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबआ ५२, १५ सप्टेंबरला ५६, १६ नोव्हेंबरला ४५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.
..या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ४४६
अहमदनगर - ५८९
पुणे - ४९५
पुणे पालिका - २२७
पिपरी चिंचवड पालिका - १७६
सोलापूर - २३२
सातारा - २३६
सांगली - १८७
हेही वाचा - महाराष्ट्र एटीएसचे पथक दिल्लीत दाखल, तर जान मोहम्मद शेखच्या कुटुंबासह रेल्वे तिकीट काढून देणाऱ्याची सुटका!