ETV Bharat / city

3 Terrorists Arrested Hyderabad : लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांना अटक, दसरा मेळाव्यात घातपाताचा कट उघडकीस

author img

By

Published : Oct 3, 2022, 6:57 PM IST

Updated : Oct 3, 2022, 8:07 PM IST

हैद्राबादमधून लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांना अटक (Lashkar e Toiba terrorists arrest Hyderabad) करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त निघणाऱ्या रॅली आणि राजकीय पक्षांचे मेळावे टार्गेट (Mumbai Dussehra Rally Terrorist Target) करून बॉम्बफेक करण्याचा कट त्यांचा उघड झाला आहे. आरएसएस आणि भाजपाच्या बैठकांना लक्ष्य करण्याचाही कट (RSS BJP Terrorist Target) उघड झाला आहे. दसऱ्यादरम्यान होणारे सर्व मेळावे या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. हे तिघेही दहशतवादी तेलंगणाचे रहिवाशी आहेत. (Mumbai Crime)

3 terrorists of Lashkar e Toiba arrested

मुंबई - हैद्राबादमधून लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांना अटक (Lashkar e Toiba terrorists arrest Hyderabad) करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त निघणाऱ्या रॅली आणि राजकीय पक्षांचे मेळावे टार्गेट (Mumbai Dussehra Rally Terrorist Target) करून बॉम्बफेक करण्याचा कट त्यांचा उघड झाला आहे. आरएसएस आणि भाजपाच्या बैठकांना लक्ष्य करण्याचाही कट (RSS BJP Terrorist Target) उघड झाला आहे. दसऱ्यादरम्यान होणारे सर्व मेळावे या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. हे तिघेही दहशतवादी तेलंगणाचे रहिवाशी आहेत. (Mumbai Crime)

हँडग्रेनेड आणि लाखाेंची रक्कम जप्त- जाहेद, हसन फारूख आणि मोहम्मद समीमुद्दीनच्या अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. दहशतवादी हल्ले आणि दंगली घडवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट बनवल्याचे उघडकीस आले आहे. पाकिस्तानात बसलेला दहशतवादी फरहतुल्ला गौरीसोबत ते संपर्कात होते. भारतातील गर्दीच्या ठिकाणी हँडग्रेनेडने हल्ला करून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा कट होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने यूएपीए कायद्यातंर्गत फरहतुल्ला गौरीला दहशतवादी घोषित केले आहे. गुप्तचर यंत्रणाच्या माहितीनुसार, फरहतुल्ला गौरी उर्फ अबू सुफियान आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा प्रमुख म्होरक्या आहे. हैदराबादमध्ये जाहेद, हसन फारूख आणि मो. समीमुद्दीन यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा फरहतुल्लाचं नाव समोर आले. पोलिसांनी या ३ दहशतवाद्यांना हैदराबादमध्ये पकडलं. त्यांच्याकडून ४ हँडग्रेनेड आणि ५ लाख ४१ हजार रुपये जप्त करण्यात आले. फरहतुल्लाच्या आदेशावरून गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट आखली असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.

अटकेतील आरोपींचा बॉस पाकिस्तानात- हैदराबादमधून फरार होऊन सध्या पाकिस्तानात धाबा धरून बसलेला दहशतवादी फरहतुल्ला गौरी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात जिहाद पसरवण्यासाठी युवकांची माथी भडकवतो. मार्च २०२२ मध्ये फरहतुल्लाबाबत माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ऑगस्टमध्ये अलर्ट जारी केला. २००२ मध्ये गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यातील आरोपी फरहतुल्ला गौरी भारतातून फरार होऊन पाकिस्तानला गेला. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने फरहतुल्लाला पुन्हा २०२२ मध्ये सक्रिय केले आहे. फरहतुल्लाच्या माध्यमातून भारतात हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं गेले असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे.

शिवाजी पार्कवरील व्यासपीठाची तपासणी - हैदराबादमधील या कारवाईनंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. मुंबईत होणाऱ्या दोन्ही दसरा मेळाव्यांना अतिरिक्त सुरक्षा मुंबई पोलीस पुरवणार आहेत. आज दुपारी मुंबई पोलीस दलाच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस विश्वास नांगरे पाटील यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली. तसेच शिवाजी पार्कवरील बीट चौकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली.

शिवाजी पार्क पाहणी करण्यासाठी नांगरे पाटील दाखल : दसऱ्याला मुंबईत होणाऱ्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या मेळाव्याला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. खुद्द विश्वास नांगरे पाटील यांनी शिवाजी पार्कवरील व्यासपीठाची तपासणी केली आहे. तसेच सध्या वेशातील पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस यांचा वावर असणार आहे.

Last Updated : Oct 3, 2022, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.