ETV Bharat / city

Mumbai Naval Dockyard Accident : आयएनएस रणवीरमध्ये स्फोट; 3 नौदल जवान शहीद

author img

By

Published : Jan 18, 2022, 9:34 PM IST

Updated : Jan 19, 2022, 12:00 AM IST

नेव्हल डॉकयार्ड मुंबई ( Mumbai Naval Dockyard Accident ) येथे आज एक दुर्दैवी घटना घडली. INS रणवीरच्या ( INS Ranvir Incident ) आत झालेल्या स्फोटात नौदलाच्या तीन जवानांना ( Naval Officer Death In INS Ranvir Incident ) जीव गमवावा लागला. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

INS Ranvir Incident
INS Ranvir Incident

मुंबई - नेव्हल डॉकयार्ड मुंबई ( Mumbai Naval Dockyard Accident ) येथे आज एक दुर्दैवी घटना घडली. INS रणवीरच्या ( INS Ranvir Incident ) आत झालेल्या स्फोटात नौदलाच्या तीन जवानांना ( Naval Officer Death In INS Ranvir Incident ) जीव गमवावा लागला. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये कोणतीही मोठी वित्तहानी झालेली नाही. INS रणवीर पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असून याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

नौदलाचे 3 जवान शहीद -

INS रणवीर नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. प्राथमिक माहितीनुसार प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. रणवीरवर झालेल्या अपघाती स्फोटात नौदलाचे 3 जवान शहीद झाले. तर काही जण यात जखमी झाले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. जहाज मुंबईच्या बंदरात होते. अनेक जखमी खलाशी किनाऱ्यावर उपचार घेत आहेत. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड आहे. तिथे आयएनएस रणवीर या युद्धनौकेच्या कंपार्टमेंटमध्ये स्फोट झाला आहे. आयएनएस रणवीर नोव्हेंबर 2021 पासून ईस्टर्न नेव्हल कमांडच्या क्रॉस कोस्टल ऑपरेशनसाठी तैनात होती.

प्रतिनिधी माहिती देताना

आतापर्यंत घडलेल्या घटना -

23 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय नौदलाच्या INS रणविजय या जहाजावर आग आणि पूर आल्याची घटना घटनेची नोंद आहे. त्या घटनेत, चार खलाशांना दुखापत झाली आणि त्यांच्यावर नौदल रुग्णालयात उपचार करण्यात आला होता. 2019मध्ये INS सिंधुकेसरी या किलो श्रेणीच्या पाणबुडीला आग लागल्याने जहाजातील गंभीर घटक नष्ट झाले. त्यावर्षी मार्चमध्ये जहाजात काही घटक बसवले जात असताना आग लागली होती. ऑगस्ट 2013मध्ये INS सिंधुरक्षक जहाजावर झालेल्या भीषण स्फोटात जहाज बुडाले आणि 18 खलाशांचा मृत्यू झाला. 2014 मध्ये आयएनएस सिंधुरत्नला लागलेल्या आगीत दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - Nagpur Crime : पतीकडून पत्नीसह दोन चिमुरड्यांची हत्या; स्वत: केली आत्महत्या

Last Updated : Jan 19, 2022, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.