ETV Bharat / city

Mumbai Drain Cleaning : नालेसफाईवर दोन वर्षात 292 कोटी खर्च, तरीही मुंबईची तुंबई - मुंबई नालेसफाई मराठी बातमी

मुंबईमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नालेसफाई केली ( Mumbai Drain Cleaning ) जात आहे. दरवर्षी नालेसफाईवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. त्यानंतरही पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होते.

Mumbai Drain Cleaning
Mumbai Drain Cleaning
author img

By

Published : Jun 1, 2022, 6:38 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नालेसफाई केली जात ( Mumbai Drain Cleaning ) आहे. दरवर्षी नालेसफाईवर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. नालेसफाई झाल्याचा दावाही पालिका प्रशासनाकडून केला जातो. त्यानंतरही पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होते. यामुळे नालेसफाईवर होणारा करोडो रुपयांचा खर्च वाया जात असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून केला जातो.

नालेसफाईवर आरोप - मुंबई महापालिकेकडून मागील वर्षी नालेसफाईवर 130 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर या वर्षी 162 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. मागील वर्षी 130 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबईत पाणी साचले होते. हिंदमाता, किंग सर्कल, सायन, मिलन सब वे आदी ठिकाणी मुंबईत दरवर्षी पाणी साचते. गेल्या वर्षी मुंबई शहर विभागातही पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळीही राजकीय पक्षांनी नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप करण्यात आला होता.

अधिक गाळ काढला - मुंबईत यंदा पालिकेची मुदत संपल्याने उशिराने नालेसफाईची कामे सुरू झाली. नालेसफाई संथगतीने सुरू असल्याने दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे तसेच जास्त मशिनरी लावण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईत 9 लाख 10 हजार 318 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले होते. 30 मे ला 100 टक्के नालेसफाई झाली आहे. आतापर्यंत पालिकेने 9 लाख 59 हजार 896 म्हणजेच 105 टक्के गाळ काढला आहे. नालेसफाईचे काम पारदर्शक पद्धतीने केले जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रभाकर शिंदे आपली प्रतिक्रिया मांडताना
करोडो रूपायांचा चुराडा - नालेसफाईवर गेल्या वर्षी 130 कोटी आणि यावर्षी 162 कोटी असे एकूण 292 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आले आहे. गेल्यावर्षी 4 हजार 556 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला. तर यावर्षी 2 हजार 156 क्यूबिक मीटर गाळ काढला. मागील वर्षापेक्षा यावर्षी कमी गाळ काढला असला तरी 32 कोटी रुपये खर्च जास्त झाला आहे. गेल्यावर्षी पालिका आयुक्तांनी 114 टक्के तर त्याआधीच्या वर्षी 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात आला, मात्र त्यानंतरही मुंबई 17 तास पाण्याखाली गेली होती. नालेसफाईच्या नावाखाली करोडो रूपयांचा चुराडा होतो. करदात्या नागरिकांचा पैसा नालेसफाईच्या नावाने कुणाच्या घशात घातला जातो हा संशोधनाचा विषय आहे. यावर सत्ताधारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने वित्त आणि जीवित हानी होते, असे भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. पहिल्या पावसात मुंबई तुंबणार - मुंबईमध्ये नालेसफाई योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे मुंबई तुंबते. नालेसफाईची काँग्रेसकडून पाहणी केली जाईल. नालसेफाई योग्य प्रकारे झाली नसल्याने पहिल्या पावसात मुंबई तुंबणार, असा दावा पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. यंदाची नालेसफाई - यंदाच्या वर्षी 9 लाख 10 हजार 318 पैकी 9 लाख 56 हजार 896 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. त्यामध्ये शहर विभागात 109, पूर्व उपनगरात 106, पश्चिम उपनगरात 104, मिठी नदीची 97 तर छोट्या नाल्यामधून 110 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. नालेसफाईची टक्केवारी -- 2022 मध्ये 105 टक्के (अद्याप काम सुरू आहे)- 2021 मध्ये 114 टक्के- 2020 मध्ये 104 टक्केनालेसफाईवर खर्च -2021 - 130 कोटी2022 - 162 कोटीमुंबईतील नाले -309 मोठे नाले ( लांबी 290 किलोमीटर)508 छोटे नाले ( लांबी 600 किलोमीटर)रस्त्यालगतची छोटी गटारे ( लांबी 200 किलोमीटर )

हेही वाचा - Sanjay Raut : राज्यसभेवरुन संजय राऊतांचा भाजपावर निशाणा; म्हणाले, "कितीही घोडे उधळू द्या, जिंकणार..."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.