आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- आज उद्योगपती राहुल बजाज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.
- लता मंगेशकर यांच्या जीवनावरील दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर जीवनावर आधारित दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात येत आहे.
- आयपीएल मेगा ऑक्शनचा आज दुसरा दिवस
काल आयपीएलच्या मेगा ऑक्शनला सुरूवात झाली होती. आज या ऑक्शनचा दुसरा दिवस आहे. काल अनेक खेळाडूंवर बोली लागली नव्हती. त्यामुळे आज त्यांच्यावर बोली लागते का, हे बघणं महत्त्वाचं आहे.
- काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आज पंजाबमध्ये प्रचार
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज पंजाबमध्ये प्रचार करणार आहे. त्या आज पंजाबमध्ये डोर टू डोर कैंपेन करतील.
- अरविंद केजरीवाल यांची अमृतसरमध्ये पत्रकार परिषद
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अमृतसर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असून आज केवळ चार हजार 359 रुग्ण सापडले आहेत. तर, 32 रुग्ण दगावले आहे. राज्याला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे ओमयक्रोनचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज एकाच दिवशी 237 बाधितांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक 226 रुग्ण मुंबईतील असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
मुंबई - देशात सद्या हिजाबवरून ( Hijab controversy ) मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. अशात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Leader Nana Patole Statement on Hijab ) यांनीही भुमिका स्पष्ट केली आहे. हिजाब आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही, आमच्यासाठी रोजगाराचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले ( Nana Patole ) यांनी दिली आहे.
नाशिक - कर्नाटकतील हिजाब ( Karnatak Hijab Case ) मुद्यावर लक्ष्य झालेली मुस्कान खान ( Muskan Khan Name For Malegaon Urdu House ) या विद्यार्थीनीने दाखविलेल्या धैर्याबद्दल आणि तीच्या सन्मानासाठी मालेगाव महापालिकेच्या उर्दू घराला मुस्कानचे नाव देण्यात येणार असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले आहे. उर्दू घराला मुस्कानचे नाव देण्यासंदर्भातला ठराव महासभेत करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
पुणे : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. आज त्यांचे दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी ४.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात 21 ( Fraud Case Register Against Shilpa Shetty ) लाख रुपये फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता याचिका करण्यात आली होती. त्या याचिकेवर शुक्रवार रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तिघींनाही 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केला आहे. याप्रकरणामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाली आहे.