ETV Bharat / city

People Beat Teacher : कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात गैरसमजुतीतून शिक्षकाला चोप दिल्याचा Video Viral - कोल्हापूर शिक्षक मारहाण व्हिडीओ

गैरसमजुतीतून एका शिक्षकाला ( People Beat Teacher ) मारहाण झाल्याची घटना भुदरगड तालुक्यात घडली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला ( Viral Video Bhudarghad Teacher Beat ) आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.

Viral Video Bhudarghad Teacher Beat
Viral Video Bhudarghad Teacher Beat
author img

By

Published : Mar 30, 2022, 7:40 PM IST

कोल्हापूर - गैरसमजुतीतून एका शिक्षकाला ( People Beat Teacher ) मारहाण झाल्याची घटना भुदरगड तालुक्यात घडली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला ( Viral Video Bhudarghad Teacher Beat ) आहे. सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची बातमी गावात पसरली आणि गावकऱ्यांनी शाळेत येऊन शिक्षकाला मारहाण केली. नंतर हा प्रकार गैरसमजुतीमधून झाल्याचे समोर आला, त्यामुळे याबाबतचा गुन्हा सुद्धा नोंदविण्यात आला नाही.

गैरसमजुतीतून शिक्षकाला मारहाण

कोणताही परस्परविरोधी गुन्हा दाखल नाही - मिळालेल्या माहितीनुसार, भुदरगड तालुक्यातील प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनिचा विनयभंग केल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. याची माहिती संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांना आणि ग्रामस्थांना समजली. त्यानंतर लगेचच सर्वांनी शाळेकडे धाव घेवून संबंधित शिक्षकाला वर्गात कोंडून मारहाण केली. यानंतर या शिक्षकाला भुदरगड पोलिसांत आणण्यात आले. पण त्यानंतर गैरसमुजतीमधून विद्यार्थीनीच्या पालकांनी या शिक्षकेला मारहाण केल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी आणि संबंधित शिक्षकांनी या प्रकरणी पोलिसात कोणतीच तक्रार न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे या विदयार्थीनीचा विनयभंग झाल्याप्रकरणी किंव्हा शिक्षकाला मारहाण झाल्या प्रकरणी कोणताच परस्पर गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला नाही. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - Pune Airport : पुणे विमानतळावर सुखोईचा टायर फुटला; खराब धावपट्टीचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.