ETV Bharat / city

Kolhapur Shivsena Agitation : वाढत्या इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरात शिवसेनेचे आंदोलन, पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी - कोल्हापूर महागाई आंदोलन

इंधन दरवाढ ( Gas Price Hike ) आणि केंद्र सरकार विरोधात कोल्हापूर ( Shivsena Agitation In Kolhapur ) शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात डोक्यावर सिलिंडर घेत ( Women Agitaion In Kolhapur ) आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( Shivsena Poster Against Pm Modi ) पोस्टरवर क्रॉस फुल्या मारून निषेध व्यक्त करण्यात आला. वाढत्या महागाईमुळे गृहिणीच बजेट ( Inflation In India ) हे पूर्ण पणे कोलमडले असून लवकरात लवकर यावर नियत्रंण मिळवणे गरजेचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

Kolhapur Shivsena Agitation
Kolhapur Shivsena Agitation
author img

By

Published : May 9, 2022, 3:39 PM IST

Updated : May 9, 2022, 7:48 PM IST

कोल्हापूर - वाढत्या इंधन दरवाढ ( Gas Price Hike ) आणि केंद्र सरकार विरोधात कोल्हापूर ( Shivsena Agitation In Kolhapur ) शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात डोक्यावर सिलिंडर घेत ( Women Agitaion In Kolhapur ) आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( Shivsena Poster Against Pm Modi ) पोस्टरवर क्रॉस फुल्या मारून त्यांचा देखील निषेध व्यक्त केला आहे. वाढत्या महागाईमुळे गृहिणीच बजेट ( Inflation In India ) हे पूर्ण पणे कोलमडले असून लवकरात लवकर यावर नियत्रंण मिळवणे गरजेचे आहे. देशात उडालेल्या महागाईचा भडका हा केवळ नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे असून आता 'मोदी हटावो देश बचावो' असा नारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे.

प्रतिक्रिया

महिलांचा 'मोदी हटाव देश बचाव'चा नारा - मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केले असून गेल्या दोन दिवसांपूर्वी सिलिंडरच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. सिलिंडरचे दर आता 1000 पार झाले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट हे चांगलेच कोलमडले असून महिन्याचे बजेट घालताना गृहिणींच्या नाकीनऊ येत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या महिलांनी डोक्यावर सिलिंडर घेत शिवाजी चौकात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. यावेळी 'मोदी हटाव देश बचावो' म्हणत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. या आंदोलनास शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे युवासेना प्रमुख मंजीत माने, विकास बुरबुसे, शुभांगी पोवार, सुजाता सुतार, शुभांगी पोवार, सुजित चव्हाण, कमल पाटील, विवेक काटकर, गीतांजली गायकवाड, दीपाली शिंदे, रवींद्र साळोखे, पूजा शिंदे, सुभाष पाटील, शिवाजी जाधव, राजेंद्र पाटील, विशाल देवकुळे, संजय पाटील, दिलीप देसाई, आकाराम पाटील, धनाजी यादव यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा - Cyclone Asani: 'असानी' चक्रीवादळ 24 तासांत ओडिशा किनारपट्टीवर धडकणार; वाचा कोणत्या दिशेने जाणार वादळ

Last Updated : May 9, 2022, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.