कोल्हापूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात येऊन अंबबाईचे दर्शन घेतेले. यावेळी त्यांनी 2020 वर्षे सर्वांना अडचणीचे गेले. मात्र येणारे 2021 वर्षे हे सर्वांना आनंदाचे, सुखा समाधानाचे, आरोग्य ऐश्वर्याचे जावो, असे साकडे अंबाबाई चरणी घातले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.
ऊर्जेची गरज असते तेव्हा आईचे आशीर्वाद-
फडणवीस यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले २०२० हे वर्ष सर्वासाठीच अडचणीचे ठरले आहे. आता हे वर्ष सरत आले आहे. नव्या वर्षाच्या आगमणापूर्वी आईचे दर्शन घेतले आहे. जेंव्हा कधी ऊर्जेचे गरज असते तेव्हा आशीर्वादाची गरज असते, आणि त्यावेळी आशीर्वाद घ्यावेच लागतात असे सांगताना या दर्शनामागे कोणताही राजकीय हेतू मनात नसल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
भाजपाकडून वारंवार महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाष्य केले जाते. त्यातच फडणवीस यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामधून त्यांच्या दर्शनामागे कोणता हेतू आहे का याबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या.