कोल्हापूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्यात गर्दी होणारी अनेक मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता कोल्हापूरचे प्रसिद्ध अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरही बंद होण्याची शक्यता आहे.
याबाबत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक बोलवण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची दिली आहे.