ETV Bharat / city

कोल्हापूर महापूर 2021 : ...अन्यथा तुमची दिवाळी कडू करू; 'स्वाभिमानी'चा इशारा

author img

By

Published : Oct 5, 2021, 7:57 PM IST

Updated : Oct 5, 2021, 8:38 PM IST

महापुराने झालेल्या नुकसान भरपाईबाबत खासदार राजू शेट्टी यांनी केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनमधून महाराष्ट्र सरकारसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर अडीच महिन्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक कोल्हापुरात आले होते. मात्र वास्तविक केंद्र व राज्य सरकारने महापुराने झालेल्या नुकसान भरपाईबाबत कोणतेही ठोस पावले न उचलता कागदी घोडे नाचवत आहेत, असे शेतकाऱ्यांमधून बोलले जात आहे.

कोल्हापूर - महापुराची पाहणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक गाडीतून उतरून शेतातसुद्धा आले नाही. केवळ 10 मिनिटात पाहणी करून काय मदत करणार, महापुरानंतर अडीच महिन्यांनी पथक आल्यावर काय पाहणी करणार, अजून शासनाकडून पूरग्रस्तांना मदत नाही. त्यामुळे दसऱ्यापर्यंत मदत जाहीर करून आमचा दसरा गोड करा, अन्यथा तुमची दिवाळी मात्र कडू करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

'नुकसान भरपाईबाबत अद्यापही कुचेष्टा'

महापुराने झालेल्या नुकसान भरपाईबाबत खासदार राजू शेट्टी यांनी केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनमधून महाराष्ट्र सरकारसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर अडीच महिन्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक कोल्हापुरात आले होते. मात्र वास्तविक केंद्र व राज्य सरकारने महापुराने झालेल्या नुकसान भरपाईबाबत कोणतेही ठोस पावले न उचलता कागदी घोडे नाचवत आहेत, असे शेतकाऱ्यांमधून बोलले जात आहे. याबद्दल शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. म्हणूनच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा याबाबत आपली नाराजी व्यक्त करत शासनाचा निषेध व्यक्त केला. शिवाय दसऱ्यापर्यंत मदत जाहीर करा, अन्यथा सरकारची दिवाळी कडू करू, असा इशारासुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

'कार्यकर्ते ताब्यात'

तब्बल अडीच महिन्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचे बुके देऊन स्वागत करण्यासाठी जाणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांना बुके व गजरचे घड्याळ भेट देण्यात येणार होते. अडीच महिन्यांनी या सरकारला व अधिकाऱ्यांना जाग आली. पुढे जर अशी आपत्ती आली तर या सरकार व अधिकाऱ्यांना वेळेवर जाग यावी म्हणून कार्यकर्ते गजरचे घड्याळ भेट देणार होते, मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Last Updated : Oct 5, 2021, 8:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.