कोल्हापूर : राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार आहे, तोपर्यंत खासदार संजय मंडलिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात, त्यानंतर ते आमच्यासोबत असतील असा मिश्किल टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील ( State President of NCP Jayantrao Patil in Kolhapur ) यांनी खा. संजय मंडलिक यांना लगावला ( MP Sanjay Mandalik Uchangi Project at Ajra ) आहे. उचंगी येथील प्रकल्पस्थळावर जलपूजनाचा कार्यक्रमचा या वेळी माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जयवंतराव शिंपी, सुधीर देसाई, रामाप्पा करिगार, भिक्मामा गावडे, बाबासाहेब पाटील, रचना होलम प्रमुख उपस्थित होते.
उचंगी प्रकल्पातील पाणीपूजन प्रसंगी अनेक नेते उपस्थित : आजरा येथील उचंगी प्रकल्पातील पाणीपूजन प्रसंगी खा. संजय मंडलिक आणि माजी मंत्री जयंत पाटील हे दोन्ही नेते शिवसेनेत बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दोघांमध्ये तुफान टोले बाजी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, अगोदर पुनर्वसन मगच नंतर धरण हे कितीही हक्काने सांगत आलो तरी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटण्यास अनेक अडचणी असतात.
धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न : सरकार कोणाचेही असेल तरी धरणग्रस्तांचे प्रश्न वेळेत सुटत नसतात. मात्र, जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी दोन-चार वेळा खासदार संजय मंडलिक माझ्याकडे आले होते. तर आमदार राजेश पाटील यांनीही या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आज दोघांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्यात सध्या आमची सत्ता नसली तरी येथील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करीत राहू.
नेत्यांच्या एकजुटीने येथील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवू : जिल्ह्यातील नेत्यांच्या एकजुटीने येथील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवू, असे पाटील म्हणाले. तसेच, राज्यात सध्या शिंदे सरकार आहे आणि जोपर्यंत शिंदे सरकार आहे तोपर्यंत खासदार संजय मंडलीक हे त्याच्या सोबत आहे शिंदे गटात आहेत. नंतर ते आमच्या सोबतच असतील असा मिश्किल टोला हि लगावला त्यावेळी उपस्थितामध्ये एकच हशा पसरला.
हेही वाचा : JDU MLA Join BJP : नितीशकुमारांना धक्का; मणिपूरमधील JDU चे पाच आमदार भाजपमध्ये दाखल