कोल्हापूर - भावाला घरातील स्टीलची किटली दिल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना कोल्हापुरातील कनान नगर येथे घडली. यात पत्नी सुनीता करण दनाने, ( वय २५ ), जखमी झाली. उपचारासाठी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पती करण किशोर दनाने, ( वय २७, रा . कनान नगर,) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की कोल्हापुरातील कनान नगर येथील विश्वशांती चौकाजवळ सुनिता दनाने या पती करण दनाने याच्यासह राहतात. शनिवारी सुनिता दनाने यांनी घरातील स्टीलची किटली आपल्या भावाला दिली होती. ही किटली भावाला दिल्याच्या रागातून करण दनाने याने रात्री पत्नी सुनीता दनाने यांना मारहाण करत त्यांच्या पायावर चाकूने हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सुनीता दनाने यांनी पती करण दनाने याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
भावाला स्टीलची किटली दिल्याच्या रागातून पत्नीवर चाकू हल्ला, पतीविरोधात गुन्हा दाखल - कोल्हापूर गुन्हा बातमी
कोल्हापुरातील कनान नगर येथील विश्वशांती चौकाजवळ सुनिता दनाने या पती करण दनाने याच्यासह राहतात. शनिवारी सुनिता दनाने यांनी घरातील स्टीलची किटली आपल्या भावाला दिली होती. ही किटली भावाला दिल्याच्या रागातून करण दनाने याने रात्री पत्नी सुनीता दनाने यांना मारहाण करत त्यांच्या पायावर चाकूने हल्ला केला.