कोल्हापूर - चक्रीवादळाचा प्रभाव कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात रविवारी दिवसभर जाणवला. जोरदार वारा आणि पावसाचा फटका कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बसला. या वादळी पावसामुळे अनेक घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळले आहेत. सुदैवानं कुठेही जीवितहानी झालेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; मोठे नुकसान - वादळी पावसा बद्दल बातमी
कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. या वादळामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; मोठे नुकसान
कोल्हापूर - चक्रीवादळाचा प्रभाव कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात रविवारी दिवसभर जाणवला. जोरदार वारा आणि पावसाचा फटका कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बसला. या वादळी पावसामुळे अनेक घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळले आहेत. सुदैवानं कुठेही जीवितहानी झालेली नाही.
वादळी पावसामुळे कोल्हापूर शहरात जवळपास बारा ते पंधरा ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या ताराबाई पार्क राजारामपुरी दसरा चौक परिसर, शाहूपुरी, हॉकी स्टेडियम, उद्यमनगर या भागात मोठे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळले. विशेष म्हणजे काढणीस आलेल्या पिकांचे सुद्धा आता नुकसान झाले आहे. भात, नाचणी, भुईमूग, मका, कलिंगड, काकडी, आंबा आदी पिकांचे यामध्ये नुकसान झाले आहे. आडसाली ऊस सुद्धा जमीनदोस्त झाला आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
अनेक भागात विजपुरवठा खंडित -
वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. शिवाय अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या सुद्धा घटना घडल्या, त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी भरपावसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना देखील पाहायला मिळाले.