ETV Bharat / city

हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ, मुलावर आणखीन एका घोटाळ्याचा आरोप - Former mayor Sunil Kadam accusation

ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. कोल्हापुरातील माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषद घेत, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय पदाचा गैरवापर करत महापालिकेची 15 गुंठे जमीन मुलाच्या नावे हडप केली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.

accusation on hasan mushrif son by sunil kadam
सुनील कदम आरोप हसन मुश्रीफ
author img

By

Published : Oct 5, 2021, 5:50 PM IST

कोल्हापूर - ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. कोल्हापुरातील माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषद घेत, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय पदाचा गैरवापर करत महापालिकेची 15 गुंठे जमीन मुलाच्या नावे हडप केली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.

माहिती देताना माजी महापौर सुनील कदम

हेही वाचा - शारदीय नवरात्रौत्सावाची तयारी जोरदार सुरू..अंबाबाईच्या रत्नजडित किरीटसह सोन्याच्या दागिन्यांना झळाळी

दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे लोकशाही दिनानिमित्त तक्रार केली असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप देखील माजी महापौर सुनील कदम यांनी केला. जर अशा पद्धतीने लोकशाही दिनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असेल तर, कार्यालयाच्या दाराबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा कदम यांनी दिला.

सुनील कदम काय म्हणतात?

मुश्रीफ यांनी त्यांच्या पदाचा, महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करत महापालिकेच्या मालकीची कोट्यावधींची जमीन बळकावली असल्याचा आरोप कदम यांनी केला. या सर्व प्रकरणाची आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माजी महापौर सुनील कदम यांनी सांगितले. लवकरच तिसरा घोटाळा उघडकीस आणणार आहे. याबाबत मी मंत्रालयात तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी माझ्यावर कोणताही दावा ठोकावा, असे जाहीर आवाहन कदम यांनी केले.

हेही वाचा - महाविकास आघाडी २५ वर्ष टिकेल; त्या पत्रातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न - मुश्रीफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.