ETV Bharat / city

वारसास्थळांच्या यादीत असणाऱ्या इमारतीला ठोकलेले खिळे 'सीपीआर'च्या मुळावर - kolhapur Heritage Architecture

कोरोनाकाळात ऑक्सिजनसाठी या इमारतीला धोका पोहोचविण्याचे काम शासकीय विभागांकडून करण्यात आले आहे.

CPR hospital
CPR hospital
author img

By

Published : Mar 23, 2021, 7:35 PM IST

Updated : Mar 23, 2021, 8:04 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून छत्रपती प्रमिलाराजे सीपीआर जिल्हा रुग्णालयाची ओळख जिल्हाभरात आहे. तर याच रुग्णालयाची जुनी इमारत जिल्ह्यातील वारसास्थळांच्या यादीत क्रमांक एकवर आहे. मात्र कोरोनाकाळात ऑक्सिजनसाठी या इमारतीला धोका पोहोचविण्याचे काम शासकीय विभागांकडून करण्यात आले आहे. या इमारतीचे जतन व संवर्धन होण्याऐवजी ती मोडकळीस कशी येईल, या दृष्टीने प्रयत्न केला आहे. त्यावर ईटीव्ही भारतचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट...

रुग्णालयाचे नामकरण

तत्कालीन मुंबई सरकारचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन याने इंग्लंड साम्राज्याचा बादशहा सर अल्बर्ट एडवर्ड याच्या राजरोहणानिमित्त सम्राटाच्या नावाने सन १८७७ साली कोल्हापुरात रुग्णालयाची पायाभरणी केली. करवीर संस्थानचे रिंजट आबासाहेब घाटगे-कागलकर यांच्या प्रशासकीय काळात व अल्पवयीन शाहू महाराज यांच्या अधिपत्याखाली या रुग्णालयाची उभारणी १८८१ला पूर्ण झाली. जवळपास ३ लाख ५ हजार ४४० रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात आली. १८८४साली ही इमारत पूर्ण करण्यात आली. मुंबई सरकारच्या रॉयल आर्किटेक्चर इंजिनीयरच्या मेजरमेंट यांच्या आराखड्याप्रमाणे ही इमारत पूर्ण करण्यात आली. रामचंद्र महादेव आणि कंपनीने बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर घेतले होते. शेनॉन हे स्टेटचे अभियंता आणि मार्तंड वामन शास्त्री हे त्यांचे सहायक होते. कालांतराने या रुग्णालयाचे नामकरण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय असे करण्यात आले.

राजवाड्याप्रमाणे इमारत

एखाद्या राजवाड्याची इमारत असावी अशी ही इमारत, प्रशस्त दरवाजे, खिडक्या, व्हरांडा, जिने हे वास्तूचे वैशिष्ट्य अधोरेखित करतात. १९३५मध्ये सात हजार रुपये खर्च करून किंग जॉर्ज पाचवा जुबली याने २०० रुग्ण क्षमतेचा वॉर्ड बांधला. त्याचप्रमाणे पद्माराजे प्रसूती रुग्णालयात बांधून परिसरात १०० रुग्णांची राहण्याची सोय व स्त्री-पुरुष असे स्वतंत्र वॉर्डची सोय करण्यात आली.

नव्या इमारतींचे बांधकाम

आहार व सल्ला देण्याबरोबरच दरबाराच्या सर्जनद्वारा लक्ष दिले जात होते. दोन सहायक सर्जन आणि एक स्त्री डॉक्टर, सहकारी, कर्मचारी अशी नेमणूक करून त्यांच्या निवासाची व्यवस्था केली होती. १९२६ साली ५१ हजार रुपये खर्च या हॉस्पिटलसाठी झाल्याची नोंद आढळून येते. यावरूनच आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थानाची भूमिका स्पष्ट होते. काळाच्या ओघात गरज लक्षात घेऊन नव्या इमारतींचे बांधकाम होत गेले. ती मूळ वास्तूशी सुसंगत नाही. मूळ इमारतीतही अनेक बदल केले गेले. दर्शनी भाग मात्र सुस्थितीत आहे.

इमारतीला धोका?

अशा पुरातन वास्तू जतन आणि संवर्धन होण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सीपीआर रुग्णालयाची ही मूळ इमारत जिल्ह्यातील वारसास्थळांच्या गॅझेटमध्ये नोंद आहे. या इमारतीची ग्रेड वन अशी नोंद गॅझेटमध्ये आहे. याची सर्व देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. असे असताना कोरोनाकाळात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी इमारतीच्या संपूर्ण भागावर खिळे ठोकले आहेत. लोखंडी स्टॅन्ड उभे करून त्यावरुन ऑक्सिजनची पाइपलाइन पसरवली आहे. त्यामुळे इमारतीच्या मूळ सौंदर्याला बाधा पोहोचली आहेच, शिवाय इमारतींच्या दगडांमध्ये खिळे ठोकल्यामुळे इमारतीला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अतिक्रमणातच अडकली वास्तू

जुन्या इमारतीच्या आवारात वाहन पार्किंग, टपऱ्या आधीचे अतिक्रमण जास्त झाले आहे. भिंतीवर लावण्यात येणारे पोस्टर्स, गुटखा खाऊन थुंकणे आदी प्रकाराने जुन्या इमारतीचे सौंदर्य नाहीसे झाले आहे.

हेरिटेज कमिटीला न विचारता काम

वारसास्थळांच्या यादीत असणाऱ्या वास्तू संदर्भात काम करावयाचे झाल्यास त्याची माहिती शहर वारसा संवर्धन समितीला देणे आवश्यक असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अशी कोणतीच माहिती वारसा संवर्धन समितीला दिली नाही. या समितीला फाट्यावर बसून सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम केले आहे. कोरोनाकाळात गडबडीने हे काम झाल्याचे सार्वजनिक बांधकाम सांगते. मात्र अशा पुरातन वास्तू नाश झाल्या तर त्या पुन्हा उभा करता येतील का? असे खडेबोल निंबाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुनावले.

'शास्त्रोक्‍त बाबी लक्षात घेऊन विकास गरजेचा'

कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलच्या ऐतिहासिक वास्तूच्या काही भागाचे हॉस्पिटल प्रशासनाकडून विद्रुपीकरण करण्यात आले आहे. ऐतिहासिक वास्तूप्रति असणारी ही असंवेदनशीलता क्लेशदायक आहे. प्रशासकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धन संबंधी जागृती निर्माण करणे, नवीन विकास करताना जतन व संवर्धनाच्या शास्त्रोक्‍त बाबी लक्षात घेऊन विकास करणे गरजेचे आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले.

'जतन, संवर्धन आवश्यक'

जिल्ह्यातील वारसास्थळांचे गॅझेट झाले आहे. या गॅझेटमध्ये या इमारतीची ग्रेड वन अशी नोंद आहे. याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. वारसास्थळाच्या ठिकाणी काम करत असताना हेरिटेज कमिटीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने काम होणे, हे त्या वास्तूच्या मुळावर येऊ शकते, मूळ वास्तूचे जतन होणे, संवर्धन होणे हे प्रत्येक नागरिकाला कळले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित त्यावर उपाय सुचवून योग्य ती कार्यवाही करावी, असे वारसा संवर्धन समितीच्या कोल्हापूर अध्यक्षा आर्किटेक अमरजा निंबाळकर यांनी केले आहे.

Last Updated : Mar 23, 2021, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.