ETV Bharat / city

दीपोत्सव : हजारो दिव्यांनी नृसिंहवाडीचा दत्त मंदिर परिसर निघाला उजळून - त्रिपुरारी पौर्णिमा

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिर परिसरात भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पहाटे 3 वाजल्यापासूनच परिसरातील नागरिक याठिकाणी दाखल झाले होते. लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण या दीपोत्सवाचा आनंद घ्यायला कृष्णा काठावर पोहोचले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सोशल डिस्टंन्सचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र होते.

deepotsav-at-datt-temple-nrusinghwadi-kolhapur-on-the-occasion-of-tripurari-paurnima
दीपोत्सव
author img

By

Published : Nov 30, 2020, 12:29 PM IST

कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी कृष्णाकाठ उजळून निघाला. कोरोनानंतर तब्बल 8 महिन्यांनी मंदिरे खुली झाल्यानंतरचा इथला हा पहिलाच सोहळा असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यावेळी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी दत्तगुरुंचे दर्शन घेत केलेल्या जल्लोषाने कृष्णाकाठ दणाणून गेला.

कोल्हापुरातील नृसिंहवाडीतील दत्त मंदिरातील दीपोत्सवाची दृश्ये

पहाटे 3 वाजल्यापासून भक्तांची अलोट गर्दी -
दत्त मंदिर परिसरात भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पहाटे 3 वाजल्यापासूनच परिसरातील नागरिक याठिकाणी दाखल झाले होते. लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण या दीपोत्सवाचा आनंद घ्यायला कृष्णा काठावर पोहोचले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सोशल डिस्टंन्सचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र होते.

कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावरील दीपोत्सव रद्द -
दरवर्षी कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावरसुद्धा मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दीपोत्सव रद्द करण्यात आला. त्यामुळे पंचगंगा नदी घाटावर यावेळी शुकशुकाट पाहायला मिळाला. दरवर्षी पहाटे 3 वाजल्यापासून हजारो कोल्हापूरकर या ठिकाणी जमायला सुरुवात करत असतात. हजारो दिव्यांनी इथला परिसर उजळून निघत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रकारे कोल्हापूर कोरोनामुक्तीकडे चालले आहे, अशा वेळी नागरिकांनी एकत्र जमून असे कार्यक्रम घेऊ नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार यंदाचा दीपोत्सव रद्द करण्यात आला.

पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात दीपोत्सव -
जिल्ह्यातील अनेक गावांमध्येसुद्धा दीपोत्सव साजरा करण्यात आला. येथील पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातसुद्धा रविवारी सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोनामुळे सर्वकाही ठप्प होत. अनेक सन साजरे करता आले नाहीत. लवकरच कोल्हापुरातून कोरोना समूळ नष्ट होवो, अशी मनोकामना करत येथील मारुती मंदिर परिसरात दीपोत्सव पार पडला. यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता.

हेही वाचा -पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरात 11 हजार पणत्यांचा 'दीपोत्सव'

हेही वाचा -५१ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळले दगडूशेठ गणपती मंदिर, त्रिपुरारीनिमित्त खास आरास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.