ETV Bharat / city

कृषी कायद्याविरोधात आज कोल्हापुरात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली

कृषी कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. आज काँग्रेसने कोल्हापुरात भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. निर्माण चौक येथून या रॅलीला सुरवात होईल.

Congress's grand tractor rally
काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली
author img

By

Published : Nov 5, 2020, 10:54 AM IST

कोल्हापूर - केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात आज गुरुवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीला प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. निर्माण चौक येथून सकाळी या रॅलीला सुरुवात होणार आहे.

नवीन कृषी कायद्याला सर्वपक्षीय विरोध होऊ लागला आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षही देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. यापुर्वी 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले होते.

दसरा चौकात रॅलीची सांगता

या कृषी कायद्याविरोधात आज जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. निर्माण चौक येथून सुरुवात होणाऱ्या या रॅलीची सांगता दसरा चौक येथे होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, तालुकाध्यक्ष व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

700 ते 800 ट्रॅक्टर आंदोलनात सहभागी होणार

जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजन केलेल्या भव्य ट्रॅक्टर रॅलीमध्ये जवळपास 700 ते 800 ट्रॅक्टर सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्वच भागातून शेतकरी या आंदोलनात भाग घेणार असून केंद्र सरकारचे या आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.