कोल्हापूर - सीएए, एनआरसी विरोधात विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मोर्चात जेएनयुमधील विद्यार्थी नेत्या अमृता पाठक सुद्धा सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी दसरा चौक येथे सभेमध्ये जोरदार भाषण करत सीएए, एनआरसीला विरोध करत जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत लढा देत राहू असे म्हटले आहे.
कोण आहेत अमृता पाठक ?
अमृता पाठक या जेएनयुमधील विद्यार्थी नेत्या आहेत. अमृता पाठक या जेएनयु आंदोलनापासून शाहीन बाग तसेच अनेक राज्यात दौरा करत सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. नुकत्याच त्यांनी बिहारमध्ये 12 जिल्ह्यात 22 सभा केल्या आहेत. 2011 पासून त्या जेएनयुमध्ये शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला एमफिल आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध विभागातून नुकतीच त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. 2013 मध्ये त्यांनी जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा लढवली होती.