ETV Bharat / city

कल्याण-शीळ मार्गावर पाईपलाईन फुटल्याने पूरसदृश्य परिस्थिती - कल्याण शीळ मार्गावर पूर

कल्याण शीळ महामार्गाजवळून जाणारी एमआयडीची मुख्य पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे पलावा सिटी परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महामार्गावरील वाहतूक खोळबली होती.

ipeline busted in kalyan
कल्याण-शीळ मार्गावर पाईपलाईन फुटल्याने पूरसदृश्य परिस्थिती
author img

By

Published : Oct 3, 2020, 9:58 AM IST

Updated : Oct 3, 2020, 10:51 AM IST

ठाणे - कल्याण-शीळ मार्गावरील पलावा सिटी समोर असलेल्या गुगली हॉटेल समोर बारवी धरणातून येणारी औद्योगिक महामंडळाची मुख्य पाईपलाईन फुटली आहे. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. शिवाय कल्याण-शीळ मार्गावर अक्षरशः पूरसदृश्य परिस्थिती निमार्ण झाल्याचे दिसून आली. परिणामी पाण्यामुळे महामार्गावरीव वाहतूक खोळांबली असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. जलवाहिनी फुटल्याचीही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

पाईपलाईन फुटल्याने पूरसदृश्य परिस्थिती

बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका आणि डोंबिवलीतील काही भागात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पलावा सिटीच्या जंक्शन ते खिडकाळी परिसरात दरम्यान रात्री साडेदहा वाजता फुटली. अचानक जलवाहिनी फुटून तिचे पाणी प्रचंड वेगाने रस्त्यावर आल्याने रस्त्याची एक बाजू रात्री उशिरापर्यंत बंद होती. त्यामुळे या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या पाईपलाईनद्वारे दिवा, मुंब्रा, कळवा या ठिकाणी पाणी पुरवठा होत होता. जलवाहिनी फुटल्यानंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल हे अधिकृतरित्या अद्याप एमआयडीसीकडून सांगण्यात आलेलं नाही. तोवर या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. दरम्यान जलवाहिनी फुटल्यामुळे शनिवारी दिवसभर डोंबिवली एमआयडीसी फेज एक, फेज दोन, एमआयडीसी निवासी विभाग, डोंबिवलीतील ग्रामपंचायती, तसंच केडीएमसी क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यानी दिली आहे.

Last Updated : Oct 3, 2020, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.