ETV Bharat / city

महाशिवरात्री स्पेशल : ठाण्यात व्हाईट रिव्हॉलूशनच्या उपक्रमात शेकडो लिटर दूध जमा

पॉज प्लॅन्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्यावतीने डोंबिवली पूर्व व पश्चिम येथील विविध शिवमंदिरात जाऊन शेकडो लिटर दूध गोळा करीत आहेत. विशेष म्हणजे हे दूध फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालयांतील मुलांना, तसेच रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजरे यांना दिले जाते.

महाशिवरात्री
महाशिवरात्री
author img

By

Published : Mar 1, 2022, 5:50 PM IST

ठाणे : महाशिवरात्री (Mahashivratri 2022) उत्सवात हजारो शिवभक्त शंकराच्या पिंडीवर दूध ओतून दर्शन घेतात. मात्र त्यामुळे शेकडो लिटर दुध वाया जाऊ नये म्हणून पॉज प्लॅन्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्यावतीने डोंबिवली पूर्व व पश्चिम येथील विविध शिवमंदिरात जाऊन शेकडो लिटर दूध गोळा करीत आहेत. विशेष म्हणजे हे दूध फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालयांतील मुलांना, तसेच रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजरे यांना दिले जाते. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ७ वर्षांपूर्वी सुरू केला होता.

व्हाईट रिव्हॉलूशन
"दुधाचे करूया दान वाढवूया महाशिवरात्रीची शान"
आज महाशिवरात्रीच्या दिवशी "दुधाचे करूया दान वाढवूया महाशिवरात्रीची शान" या उपक्रमात दुपारपर्यत ५०० लिटर दूध विविध मंदिरातून गोळा करण्यात आले आहे. पॉजच्या सदस्या साधना सभरवाल ह्यांनी हा उपक्रम राबवला आहे. रोटरॅक्ट क्लबने व्हाइट रिव्हॉलुशन म्हणून हा उपक्रम राबवला आहे. रात्रीपर्यत एक हजार लिटरच्यावर दूध सुरभी मिश्रा आणि रॉटरॅक्ट क्लब ऑफ भारत कॉलेज यांनी गोळा करण्याचा संकल्प केला आहे. आर. के. वृद्धाश्रममध्ये पॉज संस्था दरवर्षी हे दूध पुरवत असते. विशेष म्हणजे यापूर्वी वृद्धाश्रमने प्रेरणा घेऊन स्वतःच ह्या उपक्रमात सहभाग घेऊन राजेंद्र यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीत पिंपळेश्वर आणि शिवकालीन खिडकाळी मंदिरात दूध गोळा करत आहे.
Mahashivratri
सामाजिक संस्थेचा उपक्रम
उपक्रमाला प्रतिसाद
विविध शिवमंदिरातुन शेकडो लिटर दुध गोळा करून ते फिल्टर आणि गरम करून थंड केल्यानंतर रस्त्यावर फिरुन भटक्या जनावरांना दिले जाते. यंदा या उपक्रमाला शिवभक्त चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती साधना सभरवाल यांनी दिली. तर या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष भणगे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.