ETV Bharat / city

कल्याण डोंबिवलीत पुन्हा 'लॉकडाऊन', प्रशासन लागले कामाला - कल्याण डोंबिवली प्रतिबंधित क्षेत्र

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे पालिका हद्दीत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका व पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

contentment zone
प्रतिबंधित क्षेत्र
author img

By

Published : Jul 1, 2020, 4:39 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 30 जून) घेतला होता. त्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते बांबू आणि लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने सील करण्याची तयारी महापालिका व पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे.

लॉकडाऊनची तयारी करताना प्रशासन
हा लॉकडाऊन दोन जुलैपासून ते 12 जुलैच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहे. या काळात शहरात काय सुरू असेल आणि काय बंद असेल याची नियमावली ही कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. पण, त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू किराणा माल, भाजीपाला, दूध दुकान खुली राहणार की नाही, याबाबत काहीच स्पष्ट देण्यात आलेले नाही. तसेच पुन्हा लॉकडाऊन घोषित केलेल्या नव्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर साथरोग अधिनियम कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील 19 दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यामुळे गुरुवार दि. 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत घोषित केलेला लॉकडाऊन पूर्वीसारखाच कडक राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्या गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोनाचा हाहाकार; कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात आढळले तब्बल ४३६ रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.