ठाणे - कल्याणच्या आधारवाडी कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला ( Adharwadi Prison ) आहे. कारागृहातील 40 कैद्यांसह काही कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली ( Prisoners and Employees Tested Corona Positive ) आहे. आधारवाडी कारागृहामध्ये सध्या पंधराशेच्यावर कैदी असून यापैकी 40 कैद्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व कैद्यांची तब्येत सध्या ठीक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अंकुश सदाफुले ( Prison Superintendent ) यांनी दिली.
कैद्यांचे कोवीड लसीकरण पूर्ण - जिल्ह्यात पुन्हा वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 11 जानेवारी) आधारवाडी कारागृहामधील कैद्यांची कोरोना चाचणी ( Corona Test of Prisoners ) करण्यात आली. त्यापैकी 40 कैद्यांसह कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व कैद्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले असून कारागृहातील सर्वच कैद्यांचे कोवीड लसीकरण पूर्ण झाले ( Vaccination Completed of Prisoners ) आहे. तर सोमवारपासून (दि. 10 जानेवारी) बूस्टर डोस ( Booster Dose ) देणे सुरू असतानाच हा प्रकार समोर आला असून कोवीड रुग्ण सापडल्यानंतर कारागृहामध्ये सॅनिटायजेशन करण्यात आले असून उर्वरित सर्व कैद्यांना पोषक आहार देण्यात येत आहे.
कारागृहामध्येही विलगीकरण कक्ष - एखाद्या कैद्याला थंडी, ताप आल्यास कारागृहामध्ये विलगीकरण कक्षही ( Quarantine Centre in Adharwadi Jail ) बनवण्यात आला असून कोरोनाची लक्षणे ( Symptoms of Corona ) असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरुपात त्या ठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष ( Quarantine Centre in Don Bosco School ) स्थापन करण्यात आला असून नविन कैद्यांना त्या ठिकाणी ठेवले जात आहे. असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.
हेही वाचा - मला 'भाई' बोल म्हणत सराईत गुन्हेगाराचा भरचौकात तरुणावर शस्त्राने हल्ला; मुख्य आरोपी फरार