ETV Bharat / city

Jaggery powder Factory Aurangabad : तरुण शेतकऱ्याने सुपिक संकल्पनेतून साकारला 'गुळ पावडर कारखाना' - तरुण शेतकऱ्याने सुरु केले गुळ पावडर कारखा

काही वर्षात दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात उसाचे उत्पादन ( Sugarcane production increased in Marathwada ) वाढले आहे. जिल्ह्यातील बापूराव चव्हाण ( Bapurao Chavan Young Farmer ) या युवा शेतकऱ्याने स्वतःचे गाळप करून गुळ पावडर ( Jaggery powder business Factory Aurangabad ) तयार करण्याचा कारखाना सुरु केला. 1 लाख 35 हजार टन ऊसाचे गाळप पूर्ण करत शेतकऱ्यांना वाहतूकीसह ऊसाचे पैसे देखील त्याने अदा केले आहेत.

गुळ कारखाना
गुळ कारखाना
author img

By

Published : Jun 1, 2022, 3:36 PM IST

Updated : Jun 1, 2022, 3:52 PM IST

औरंगाबाद - मराठवाड्यात शेतकऱ्यांचा शेतात उभा असलेला ऊस चिंतेचे कारण ठरत आहे. कारखानदार ऊस नेत नसल्याने बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी हक्काच्या अशा ऊसाच्या पिकाकडे वळला आहे. काही वर्षात दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात उसाचे उत्पादन ( Sugarcane production increased in Marathwada ) वाढले आहे. जिल्ह्यातील बापूराव चव्हाण ( Bapurao Chavan Young Farmer ) या युवा शेतकऱ्याने स्वतःचे गाळप करून गुळ पावडर ( Jaggery powder business Factory Aurangabad ) तयार करण्याचा कारखाना सुरु केला. 1 लाख 35 हजार टन ऊसाचे गाळप पूर्ण करत शेतकऱ्यांना वाहतूकीसह ऊसाचे पैसे देखील त्याने अदा केले आहेत.

तरुण उद्योजक आणि शेतकऱ्याने दिलेली प्रतिक्रिया


ऊस विक्री होत नसल्याने सुरु केला कारखाना : मौसम निघून जातो, मात्र शेतातातला ऊस कारखान्यात जात नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या देखील केली. मात्र याच समस्येवर खचून न जाता, बीड जिल्ह्यातील गुळज या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पर्याय निर्माण केला. तो म्हणजे गुळ तयार करायचा कारखाना. बापूराव चव्हाण या तरुण शेतकऱ्याने संकल्पना समोर आणत. कारखाना यशस्वी रित्या सुरु करत अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 40 हजार टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्या माध्यमातून जवळपास 2 लाख क्विंटल गुळ पावडर निर्मिती त्यांनी केली आहे.


गुळमेश्वर ऍग्रो शेतकऱ्यांना देतो दिलासा : मराठवाड्यातील शेतकरी ऊस उत्पादन अधिक असल्याने चिंतीत झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी लढण्याचा मार्ग गुळज गावातील शेतकरी बापूराव चव्हाण यांनी निवडला. 2006 मध्ये घेतलेल्या उसाला कारखानदारांनी घेण्यास अनास्था दाखवली. त्यामुळे आपल्या सारखी परस्थिती इतर शेतकऱ्यांची देखील आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं त्यांनी ठरवलं. ऊस उत्पादक काही शेतकऱ्यांना सोबत घेत त्यांनी गुळमेश्वर ऍग्रो नावाने कारखाना सुरु करण्याचा निश्चय केला. डिसेंबर 2021 मध्ये गावातच गुळ पावडर तयार करण्याचा कारखाना सुरु केला. सहा महिन्यात एक लाख 40 हजार टन ऊस कारखान्याने शेतकऱ्यांकडून विकत घेतला. त्याचे प्रवासाचे पैसे आणि उसाचे पैसे देखील शेतकऱ्यांना दिले असल्याची माहिती बापूराव चव्हाण यांनी दिली आहे.


अर्थसाह्य उभा करण्यासाठी लागला वेळ : कुठलाही उद्योग असो त्यासाठी भांडवल गरजेचे असते. त्यात गुळ पावडर तयार करण्याचा प्रकल्प म्हणजे खर्चिक बाब होती. बापूराव चव्हाण यांनी शेतकऱ्यासोबत येऊन पैशांची जुळवाजूळव सुरु केली. 35 कोटी इतका खर्च कारखण्यासाठी होता. एसबीआय बँकेने 28 कोटींचे कर्ज दिले. सात कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीने उभे केले. डिसेंबर 21 मध्ये कारखाना सुरु झाला. या कारखान्यात बीड, जालाना, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकरी आपला ऊस घेऊन येत आहेत. तर कारखान्यात तयार झालेली गुळ पावडर परराज्यांसह परदेशात पाठवली जात आहे. या भागात शेवटचा ऊस संपेपर्यंत कारखाना ऊस घेईल, अशी माहिती बापूराव चव्हाण यांनी दिली. तर या कारखान्यामुळे दिलासा मिळाल्याचे मत शेतकऱ्यांनी ईटीव्हीकडे व्यक्त केलेा आहे.

हेही वाचा - Sanjay Raut on Satej Patil : यापुढं आमचं ठरलंय वगैरे काही चालणार नाही.. कोल्हापुरात येऊन संजय राऊतांचा सतेज पाटलांशी पंगा

Last Updated : Jun 1, 2022, 3:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.