औरंगाबाद - जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्तव्य पार पाडत असणारे अनेक वैद्यकीय अधिकारी आहेत. यामध्ये पती-पत्नी असणारे औषध निर्माण अधिकारी आणि सहपरिचारिका अहोरात्र सेवा देत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना कक्ष बनवण्यात आला आहे. हे जिल्ह्यातील एकमेव कोरोना रुग्णालय असून या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. प्रेमचंद कांबळे, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. महेश लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व रुग्णांची तपासणी व देखभाल सुरू आहे. या ठिकाणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे एकूण 28 वैद्यकीय अधिकारी आहेत. ते रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर उपचार करत आहेत. यांमध्ये डॉ. संतोष राठोड आणि त्यांच्या पत्नी सुनिता राठोड हे देखील सेवा बजावत आहेत.
सध्या ते दोघेही कोरोना रुग्णांचे स्क्रीनींंग करत आहेत. आपत्ये आणि ते दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहतात. मुलगा व पुतणी मागे लागतील किंवा जवळ येतील, या भीतीने अनेकदा चोरून घरात प्रवेश करत असल्याचे संतोष राठोड यांनी सांगितले.