ETV Bharat / city

Aurangzeb : दिल्लीचा शहेनशहा औरंगजेबाची का आहे खुलताबादेत कबर, जाणून घ्या सविस्तर माहिती - औरंगजेबाची का आहे खुलताबादेत कबर

हैदराबादमधील आमदार आणि एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबादेत शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी गुरुवारी आले होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गां आणि औरंगजेब यांच्या कबरीला भेट ( Akbaruddin Owaisi Visit Dargahs Khultabad ) दिली. यावरुन भाजप आणि शिवसेना यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर संजय राऊत हे म्हणाले की, औरंगजेबाप्रमाणेच तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल.

Who Is Aurangzeb
औरंगजेबाची का आहे खुलताबादेत कबर
author img

By

Published : May 13, 2022, 2:26 PM IST

Updated : May 19, 2022, 2:10 PM IST

औरंगाबाद - हैदराबादमधील आमदार आणि एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबादेत शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी गुरुवारी आले होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गा आणि औरंगजेब यांच्या कबरीला भेट ( Akbaruddin Owaisi Visit Dargahs Khultabad ) दिली. यावरुन भाजप आणि शिवसेना यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाप्रमाणेच तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल. यामुळे राज्यात पुन्हा एकदा औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. त्यामुळे औरंगजेब या मुघल राजाचे नाव पुन्हा समोर आले आहे. यानिमित्ताने थोडक्यात जाणून घेऊया औरंगजेब विषयी....

औरंगजेब याचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 मध्ये गुजरातेत झाला होता. औरंगजेब (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हे मोगल सम्राट होते. त्यांनी त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता. गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारे ते पहिले मुसलमान राज्यकर्ता होता. तसेच त्यांनी जिझिया कर परत लागू केला. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्‍नांत घालवला.

राजकीय कारकिर्दीची सुरुवात - १६३४ मधे शाहजहानने औरंगजे़बास मुघल प्रथेनुसार दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजे़बांनी मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते औरंगाबाद केले. इ.स.१६३७ साली औरंगजे़बांनी रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. जहान‍आरा बेगम ही औरंगजे़बांची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजे़बांची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगज़ेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजे़बाला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाही. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. तेथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान (अफगाणिस्तान) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.

औरंगजेबाचा सत्तासंघर्ष - सन १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला होता. यावेळी औरंगजेबाने त्याला कैद करून मारले, अशी अख्यायिका आहे. त्यानंतर सत्तेसाठी दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगजेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते. त्या शाह सुज़ाला औरंगजे़बाकडून हार पत्करून ब्रह्मदेश येथील अराकानक्षेत्री जावे लागले. १६५९ साली औरंगजे़बानेनी शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व दाराशुकोहचा शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहानला मारण्यासाठी औरंगजे़बांनी दोनदा विष पाठवले होते. पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते. ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहानला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.

शिवाजी महाराजांची आगऱ्यातील नजरकैद - इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजीदेखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. या नजरकैदेतून सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.

औरंगजेबाने संभाजी राजांना ठार केले - ३ एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्यानंतर संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. औरंगजेबाने इ.स.१६८९मध्ये संभाजीराजे यांना ठार मारवले. महाराष्ट्रात २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजे़बांच्या हाती काहीच लागले नाही.

अहमदनगरमध्ये मृत्यू तर खुलताबादेत कबर - औरंगजेबाला दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्यांना काहीच साधता आले नाही. औरंगज़ेबांचा ३ मार्च, इ.स. १७०७ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे मृत्यू झाला. औरंगजे़बानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. त्यांची कबर खुलताबाद येथे ( Aurangzeb Grave in Khultabad Dargahs ) आहे. खुलताबाद येथे जर्जरी बक्ष दर्गा आहे. या ठिकाणी अनेक सुफी संतांचे वास्तव्य होते. तसेच औरंगजेबाचे गुरू मीर मोहम्मद हकीम खजुआ यांची कबर येथे आहे. येथे मनाला शांतता लाभते असे त्यांचे म्हणणे होते, त्यामुळे औरंगजेबाला ही जागा विशेष आवडत होती. आपली समाधी गुरु शेजारीच असावी अशी औरंगजेबाची इच्छा होती, त्यामुळे त्यांने आपली कबर खुलताबादेत करण्याची इच्छा त्याच्या मुलाकडे व्यक्त केली होती. त्यानुसार त्याची कबर खुलताबादेत करण्यात आली, अशी एक अख्यायिका प्रसिद्ध आहे. तसेच मी शहेनशहा असलो तरी माझी कबर मातीची असावी आणि तीही माझ्या कमईच्या 14 रुपये 12 आण्यामध्ये बांधावी ही इच्छा होती. त्यामुळेच त्याच्या मुलाने औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याची कबर खुलताबादेत मातीची बांधली होती. आता तिथे असलेली संगमरवरी जाळी ही निजामाने लावली आहे. औरंगजेबाच्या मातीच्या कबरीवर तुळस देखील लावलेली आहे.

ओवेसीने कबरीला भेट दिल्यावरून वाद - हैदराबादमधील आमदार आणि एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी ( MIM leader Akbaruddin Owaisi ) हे औरंगाबादेत शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवेसी गुरुवारी आले होते. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील दर्गां आणि औरंगजेब यांच्या कबरीला भेट ( Akbaruddin Owaisi Visit Dargahs Khultabad ) दिली. मस्जिदीत नमाज देखील अदा केली. तसेच शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांची जीभ घसरली होती. त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप आणि शिवसेना यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर संजय राऊत हे म्हणाले की, तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल. सविस्तर वाचा...

Last Updated : May 19, 2022, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.