ETV Bharat / city

Theft in Zulelal Temple : बायकोचा पर्स घेण्याचा हट्ट.. बेरोजगार तरुणाने मंदिरात केली चोरी! - Theft in Zulelal Temple

चेलीपुरा भागात राहणाऱ्या जावेद जुम्मा पठाण याला पत्नीच्या हट्टामुळे पोलीस ठाण्याची हवा ( youth steals money for wifes purse ) खावी लागली. मागील काही दिवसांपासून जावेद हा बेरोजगार होता. बायकोसारखी पैशांची मागणी करायची असल्यामुळे तो त्रस्त होता. त्यामुळे त्याने चोरी ( Unemployed youth steals money ) केली आहे.

आरोपी
आरोपी
author img

By

Published : Dec 7, 2021, 6:55 PM IST

Updated : Dec 7, 2021, 7:16 PM IST

औरंगाबाद - बायकोला पर्स घ्यायची म्हणून एकाने चक्क मंदिरात मूर्ती चोरल्याचा धक्कादायक प्रकार शहागंज ( Theft case in Aurangabad ) परिसरात घडला. पोलिसांनी अवघ्या काही तासात चोराला जेरबंद केले आहे. जावेद जुम्मा पठाण असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

चेलीपुरा भागात राहणाऱ्या जावेद जुम्मा पठाण याला पत्नीच्या हट्टामुळे पोलीस ठाण्याची हवा खावी ( youth steals money for wifes purse ) लागली. मागील काही दिवसांपासून जावेद हा बेरोजगार होता. बायकोसारखी पैशांची मागणी करायची असल्यामुळे तो त्रस्त होता. त्यात शनिवारी बायकोने 5 हजारांची महागडी पर्स घेऊन द्यावा, यासाठी त्याच्याकडे हट्ट धरला. इतकेच नाही तर पर्स घेतल्याशिवाय घरीच यायचे नाही, अशी तंबी दिली. त्यामुळे जावेद हतबल झाला.

बेरोजगार तरुणाने मंदिरात केली चोरी

हेही वाचा-Thane Crime News : सेल्फीच्या नादात 13 वर्षीय मुलाने गमावला जीव

शहागंज भागात फिरत असताना त्याला झुलेलाल मंदिर ( money stolen from Zulelal temple ) दिसले. फारशी सुरक्षा नसल्याचे त्याने पाहिले. परिसरातील व्यापारी दानपेटीत पैसे टाकत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने दानपेटी फोडायची ठरविले. जावेदने दानपेटी फोडून 5 हजार रुपये लंपास केले. मंदिरातील चांदीची मूर्ती आणि दिवेही चोरले. ही बाब सकाळी पुजाऱ्यांच्या लक्षात आले.

हेही वाचा-Hotel Worker's Murder Near Shirdi : लोणीत डोक्यात दगड घालून हाॅटेल कामगार महिलेची निर्घृण हत्या

अवघ्या काही तासात चोर जेरबंद-
आरोपीने कधीही चोरी केली नाही. ही त्याची चोरीची पहिली वेळ असल्याने पोलिसांना अनेक पुरावे मिळाले. मंदिरातील एक सीसीटीव्हीत तो कैद झाला. त्याचा माग घेत परिसरातील इतर सीसीटीव्ही तपासण्य़ात आले. जावेदचे घर सापडले. पोलिसांनी त्याला 5 तासात अटक केली. त्याच्याकडून मंदिरातील धातुची दोन मुर्ती, एक लहान व एक मोठी आणि लोखंडी दान पेटी जप्त करण्यात आली आहे. तसेच एक तांब्याच्या पुरातन समईसह रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी ( PI Ashok Giri ) यांनी दिली.

हेही वाचा- LPG Gas Cylinder Weight : घरगुती गॅस सिलेंडरचे वजन होणार कमी - हरदिप सिंग पुरी

Last Updated : Dec 7, 2021, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.