ETV Bharat / city

स्वातंत्र्य लढ्यासारखाच हैदराबाद मुक्ती संग्राम लढा होता, सांडू कऱ्हाळे यांच्याकडून आठवणींना उजाळा - Hyderabad Liberation

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस. दरम्यान, स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा प्राणपणाला लाऊन लढा देणारे सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम कऱ्हाळे यांच्याशी ईटीव्ही भारतची खास बातचीत-

स्वातंत्र्य सैनिक सांडू कऱ्हाळे
स्वातंत्र्य सैनिक सांडू कऱ्हाळे
author img

By

Published : Sep 17, 2021, 12:13 PM IST

औरंगाबाद - आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस. दरम्यान, स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम लढा प्राणपणाला लाऊन लढा देणारे सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील स्वातंत्र्य सैनिक सांडू तुकाराम कऱ्हाळे यांच्याशी ईटीव्ही भारतची खास बातचीत-

माहिती देताना स्वातंत्र्यसैनिक

'अनेक ठिकाणी जनतेवर अन्याय अत्याचार झाले'

मराठवाडा ही संतांची भूमी आहे. तसे पाहिले तर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमुळे सिल्लोड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर कोरले गेलेले आहे. तालुका परिसरात इंग्रजाचे वास्तव होते. त्यावारोबर निजामाचे या परिसरावर अधिपत्य होते. अस म्हणतात निजामाने सिल्लोड तालुका परिसरात अनेक ठिकाणी जनतेवर अन्याय अत्याचार केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयाच्या बरोबरीने हा हैदराबाद मुक्ती संग्राम लढला गेला. मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक शूर विराणी लढा दिलाय या योगदानात सिल्लोड तालुक्याचे महत्वाचे योगदान आहे.

'स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाव लढा दिला'

या लढयातील स्वतंत्र सैनिक सांडू तुकाराम कऱ्हाळे हे आज मितीला हयात आहेत. त्यांचे मुळगाव तालुक्यातील निल्लोड होय. निजामाच्या राजवटी जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढले होते. या जुलमी निजामाविरुद्ध लढा देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्व खाली गावागावातून अनेक शूर वीर पुढे आले. त्या सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील सांडू तुकाराम कऱ्हाळे हे होय. विद्यार्थी दशेपासून त्यांनी भारतीय स्वतंत्र संग्राम व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात उडी घेतली होती.

'विद्यार्थी दशेपासून कामाला सुरूवात'

त्या काळी निल्लोड येथे फक्त प्राथमिक शिक्षणाची सोय होती. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते औरंगाबाद येथे गेले होते. त्याचवेळी देशात भारतीय स्वतंत्र लढा तेजीत आला. मराठवाडात ही निजामाच्या राझाकाराकडून सर्वसामन्य जनतेवर अतोनात अत्याचार सुरु होते. शिक्षण घेत असताना सांडू कराळे यांचा मनावर इंग्रज निजामाच्या अन्याय अत्याचारचे स्पंदने उमठत होती. विद्यार्थी दशेपासून त्यांनी भारतीय स्वतंत्र संग्राम व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात उडी घेतली होती. या काळात कऱ्हाळे यांनी डम्बेल, लाठ्याकाठ्या चालविणे, भाला फेक करणे , तलवार चालविणे याचे प्रशिक्षण स्वतंत्र व मुक्ती संग्रामातील आपल्या सहकाऱ्यांकडून शिकले होते. जनते वर निजामाचा सुरु असलेल्या अत्याचारामुळे कऱ्हाळे यांच्या मनात मोठा संताप उफाळून येत होता.

'अखेर निजाम गेले आणि मराठवाडा मुक्त झाला'

याच काळात त्यांनी भारतीय स्वतंत्र लढा व मराठवाडा मुक्ती संग्रामात उडी घेतली. निजाम राजवटीविरुद्ध प्रथम शाळा कॉलेजवर बहिष्कार टाकणे, वकिलांनी कोर्टाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणे. निल्लोड येथील पोलीस पाटील व पटवारी यांचे दप्तर जाळून टाकून जमा केलेले अन्नधान्य गोर गरीब जनतेला वाटून देणे अशा प्रकारे या भागात निजामाना जेरीस आणले होते. त्यानंतर भारतीय लष्कराणे कारवाई सुरु केल्याने अखेर निजाम गेले आणि मराठवाडा मुक्त झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.