ETV Bharat / city

एसटीचा पर्यटकांना फटका, जादा पैसे देऊन करावा लागतोय बैलगाडीने प्रवास - एसटी संप+बैलगाडी प्रवास

एसटी बसच्या संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खासगी वाहतूकदार वाढीव पैसे आकारत असल्याने त्यांची लूट होत असल्याचे दिसून आले. तसाच अनुभव अजिंठा परिसरात पर्यटकांनादेखील येत आहे. अजिंठा लेणी परिसरात जाताना बस उपलब्ध नसल्याने बैलगाडीचा आसरा घ्यावा लागत आहे.

एसटी संप+बैलगाडी प्रवास
एसटी संप+बैलगाडी प्रवास
author img

By

Published : Nov 10, 2021, 8:20 PM IST

Updated : Nov 10, 2021, 8:32 PM IST

औरंगाबाद - राज्यभर एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपाचा फटका जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना बसला आहे. विशेषता अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बस उपलब्ध नसल्याने बैलगाडीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यात आकारले जाणारे दर हे वाजवीपेक्षा जास्त असल्याने अनेक पर्यटक लेणी न पाहताच माघारी जात असल्याचे दिसून येत आहे.

बैलगाडीतून केला पर्यटकांनी प्रवास

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात. मात्र या पर्यटकांना एसटी बंदचा फटका बसला आहे. अजिंठा लेणी परिसरात जात असताना फरदापूरजवळ आपली खासगी वाहने सोडून एसटीच्या बसने लेणी परिसरात दाखल व्हावे लागते. पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी मात्र बस उपलब्ध नसल्याने पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच स्थानिक नागरिकांनी बैलगाडीची व्यवस्था ही करून दिल्याने, पर्यटक बैलगाडीतून प्रवास करत लेणी परिसरात दाखल होत आहेत.

जास्त पैसे आकारून बैलगाडीने करावा लागतो प्रवास

एसटी बसच्या संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खासगी वाहतूकदार वाढीव पैसे आकारत असल्याने त्यांची लूट होत असल्याचे दिसून आले. तसाच अनुभव अजिंठा परिसरात पर्यटकांनादेखील येत आहे. अजिंठा लेणी परिसरात जाताना बस उपलब्ध नसल्याने बैलगाडीचा आसरा घ्यावा लागत आहे. मात्र तसे करत असताना बैलगाडीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक लेणी न पाहताच माघारी परतण्याचा निर्णय घेत आहेत. वातानुकूलित बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र एसटीच्या डिझेल बस तिथे कार्यरत आहेत. त्यामुळे एखाद्या खासगी कंपनीच्या वातानुकूलित बस तिथे सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक व्यवसायिकांनी केली आहे.

Last Updated : Nov 10, 2021, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.