ETV Bharat / city

मुलीकडे एकटक बघितल्यामुळे एकाला दंडासह सक्तमजुरीची शिक्षा - मुलीकडे एकटक बघितल्यामुळे शिक्षा औरंगाबाद

१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील उद्यानात सायकल खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी दामोदर तिच्या मागे गेला आणि वाईट नजरेने एकटक पाहू लागला. असा प्रकार मागील २०-२५ दिवसांपासून सतत चालू होता.

Aurangabad
Aurangabad
author img

By

Published : Feb 9, 2021, 8:27 AM IST

औरंगाबाद - १३ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे एकटक नजरेने बघणाऱ्या व्यक्तीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनील एका व्यक्तीला ही शिक्षा सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या ३७ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.

काही दिवसांपासून करत होता पाठलाग...

१३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील उद्यानात सायकल खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी दामोदर तिच्या मागे गेला आणि वाईट नजरेने एकटक पाहू लागला. असा प्रकार मागील २०-२५ दिवसांपासून सतत चालू होता. पाठलाग करणारा दामोदर हा फिर्यादीकडे सतत वाईट नजरेने एकटक पाहात होता. शालेय साहित्य आणण्यासाठी फिर्यादी जात असतानाही तो पाठलाग करायचा. एके दिवशी मामाच्या घरी जात असतानाही आरोपी मागे आला, बाहेर उभा राहून एकटक तो तिच्याकडे पाहत होता. त्याबाबतची माहिती तिने मामाला दिली. मामाने व इतरांनी मिळून आरोपीला पकडून जिन्सी पोलीस ठाण्यात नेले.

जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल...

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून दामोदर विरुद्ध भादंवि कलम ३५४ व पोक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विशेष सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागुला यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्याआधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. यामध्ये फिर्यादीची व घटनेतील प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने दामोदर राबडा याला भादंवि कलम ३५४ (ड) खाली सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजारांचा दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

हेही वाचा - PAK vs SA: दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश, कसोटी मालिकेत पाकिस्तान २-० ने विजयी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.