औरंगाबाद - शहराचे ग्रामदैवत समजल्या जाणाऱ्या संस्थान गणपतीची स्थापना आज सकाळी साडेसहा वाजता करण्यात आली. या वेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
औरंगाबाद शहराची परंपरा आहे की जो पर्यंत ग्रामदैवत समजल्या जाणाऱ्या संस्थान गणपतीची स्थापना होत नाही तो पर्यंत गणेश मंडळ देखील गणरायाची स्थापना करत नाही. संस्थान गणपतीच्या स्थापनेनंतरच सर्व मंडळांची गेणेश मूर्तीची स्थापना होते. आज राज्यमंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदूकुमार घोडेले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करून गणरायाची स्थापना करण्यात आली.