औरंगाबाद शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट (Sanjay Shirsat) यांना स्थान मिळालं नाही. यामुळे वेगवेगळ्याप्रकारे राजकीय चर्चेला ऊत आला होता. याचाच एक भाग म्हणजे औरंगाबादचे भाजपचे माजी उपमहापौर (Former Deputy Mayor of BJP) राजू शिंदे (Raju Shinde) यांनी काही ठिकाणी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आगामी निवडणूक भाजप तर्फे लढवतील असं मत व्यक्त केलं. यावर, कायम एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) राहणार असी संजय शिरसाटांची प्रतिक्रीया (Sanjay Shirsat Reaction) आली आहे. चर्चांना शिरसाट यांनी पूर्णविराम दिला आहे. कोणी काही जरी बोलत असलं तरी, मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत राहीनं. भाजप (BJP) पक्षातील कोणी जर स्वतःचं वैयक्तिक मत व्यक्त केल असेल तर त्याबाबत आपल्याला कल्पना नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
मी शिंदे साहेबांसोबत राहणार समाज कल्याण विभाग मंत्री अथवा पालकमंत्री पद मिळावं अशी इच्छा संजय शिरसाट यांनी मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी बोलून दाखवली होती. मात्र, शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट यांना स्थान मिळालं नाही. असं असलं तरी आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांसोबत आपण कायम राहू असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलं. मतदार संघात काहीजण मुद्दाम चर्चा घडवून आणत आहेत. मात्र, त्याचा परिणाम होणार नाही. अशी टीका देखील शिरसाट यांनी केली.
भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी व्यक्त केली होती भावना भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही ठिकाणी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आगामी निवडणूक भाजप तर्फे लढवतील असं मत व्यक्त केलं. 2024 विधानसभा निवडणुकीत पक्ष ज्यांचा प्रचार करायला सांगेल त्यांच्यासोबत आम्ही काम करू. त्यामुळे शिरसाट यांना जर पक्षाने तिकीट दिलं तर त्यांचं काम आपण निश्चित करू असं शिंदे यांनी सांगितल्याने सर्वत्र चर्चा रंगल्याच पाहायला मिळालं. मंत्रीपद न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज (Sanjay Shirsat Upset) आहेत. त्यांनी ती नाराजी जाहीरपणे अनेक वेळा बोलूनही दाखवली. त्यामुळे राजू शिंदे यांच्या वक्तव्याला वेगळं महत्व प्राप्त झाला होतं.