ETV Bharat / city

राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी लोकसभा प्रचारात मग्न, पाणी टंचाईकडे दुर्लक्ष! - AURANGABAD

जिल्ह्यातील पैठणच्या बाळापुर गावात उन्हात महिला आणि मुलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना ऐन उन्हात पायपीट करावी लागत आहे.

बाळापूर गावात भीषण पाणीटंचाई
author img

By

Published : Apr 10, 2019, 11:32 AM IST

औरंगाबाद - सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. प्रचारात मोठी मोठी आश्वासने ही प्रत्येक उमेदवारांकडून दिली जातात. कोणत्या राजकीय पक्षाला किती मते मिळणार याची चर्चा रंगत आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागात पाणी कधी मिळणार याचे उत्तर मात्र कोणाकडे नाही. ऐन दुष्काळात लोकांना पाण्याचा टँकर कधी येणार हा प्रश्न पडलाय?

बाळापूर गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया

जिल्ह्यातील पैठणच्या बाळापुर गावात उन्हात महिला आणि मुलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या गावात २ टँकर मंजूर आहेत. १ किंवा २ दिवसांनंतर गावकऱ्यांना पाणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना ऐन उन्हात पायपीट करावी लागत आहे. पाणी कमी असल्याने टँकर मालकाकडे २ दिवस आधी नंबर लावावा लागतो. त्यामुळे टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

प्रशासनाने या गावांमध्ये टँकरची सोय केली आहे. मात्र, प्रत्यक्षात हे टँकर कधीच वेळेवर गावात पोहोचत नाही. नेमून दिलेले टँकर ८ ते १० दिवसांनी गावात येतात. त्यामुळे तहान भागवावी कशी? असा प्रश्न येथील लोकांना पडला आहे. उन्हात पाण्यासाठी वणवण फिरताना गावकऱ्यांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होतोय. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. मात्र, थोडेफार पाणी मिळालं तरी जनावरांसाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न या गावातील लोकांना पडला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दुष्काळ निवारणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्याची माहिती दिली. औरंगाबाद जिल्ह्यात ८९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीची मदत घेतली जाते. तर, वैजापूर तालुक्यातील गावांना नाशिक धरणातून सध्या पाणी देण्यात येते. काही प्रकल्प तात्पुरता योजना सुरू केल्या आहेत. त्यांना तत्वतः मान्यता मिळाल्याने गावांमध्ये पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ६ चारा छावण्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातील काही चारा छावण्या या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. इतर उपयोजना देखील करण्यात येणार असून सध्या तरी कुठल्याही प्रकारची पाणीकपात केली जाणार नाही. जून महिन्यात पाण्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

जिल्हा प्रशासनाने दुष्काळाच्या काळात अनेक उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. मात्र, या उपाययोजना गावांमध्ये पोहोचतात का हा खरा प्रश्न आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांचा प्रचार जोर धरत असला तरी, प्रचाराच्या रणधुमाळीत मराठवाडा अजून दुष्काळाशी सामना करतोय.

Intro:सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते. प्रचारात मोठी मोठी आश्वासने ही प्रत्येक उमेदवारांकडून दिली जातात. कोणत्या राजकीय पक्षाला किती मतं मिळणार याची चर्चा रंगत आहे, मात्र दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागात पाणी कधी मिळणार याचे उत्तर मात्र कोणाकडे नाही.

Body:ऐन दुष्काळात लोकांना पाण्याचा टँकर कधी येणार हा प्रश्न पडलाय. टॅंकर पाठवण्याचे नियोजन पूर्णतः कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत प्रशासन नियोजन केल्याच सांगत असलं तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागात पाणी बाणी दिसून येत आहे.

Conclusion:औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण च्या बाळापुर गावात रखरखत्या उन्हात महिला आणि मुलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या गावात तसे दोन टँकर मंजूर आहेत. एक किंवा दोन दिवसावआड गावकऱ्यांना पाणी मिळणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नाही. त्यामुळे गावकर्यांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना ऐन उन्हात पायपीट करावी लागत आहे. पाणी मिळालं नाही तर पाणी विकत घ्याव लागत असल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे. पाणी कमी असल्याने टँकर मालकाकडे दोन दिवस आधी नंबर लावावा लागतो. दोन दिवसात ज्या वेळेस पाणी मिळेल त्या वेळेस टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. प्रशासनाने या गावांमध्ये टँकरची सोय केली आहे मात्र प्रत्यक्षात हे टँकर कधीच वेळेवर या गावात पोहोचत नाही. नेमून दिलेले टँकर आठ ते दहा दिवसांनी या गावात येतात त्यामुळे तहान भागवावी कशी असा प्रश्न लोकांना पडला आहे. उन्हात पाण्यासाठी वणवण फिरताना गावकऱ्यांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होतोय. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते मात्र थोडंफार पाणी मिळालं तरी जनावरांसाठी पाणी आणावं कुठून असा प्रश्न या गावातील लोकांना पडला आहे.

byte - वर्षा वीर - गावकरी
byte - शेख जाकीर - सरपंच

दुष्काळ निवारणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली। औरंगाबाद जिल्ह्यात 894 टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, इतकंच नाही तर टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीची मदत घेतली जाते आहे. तर वैजापूर तालुक्यातील गावांना नाशिक या धरणातून सध्या पाणी देण्यात येते आहे. काही प्रकल्प तात्पुरता योजना या सुरू केल्या असून त्यांना तत्वतः मान्यता मिळाल्याने गावांमध्ये पाणी पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात सहा चारा छावण्यांना मान्यता देण्यात आली असून त्यातील काही चारा छावण्या या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. इतर उपयोजना देखील करण्यात येणार असून सध्या तरी कुठल्याही प्रकारची पाणीकपात ही केली जाणार असून, जून महिन्यात पाण्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

उदय चौधरी - जिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाने दुष्काळाच्या काळात अनेक उपाययोजना केल्याचा दावा केला आहे मात्र या उपाययोजना गावांमध्ये पोहोचतात का हा खरा प्रश्न आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांचा प्रचार जोर धरत असला तरी, प्रचाराच्या रणधुमाळीत मराठवाडा अजून दुष्काळाशी सामना करतोय याची आठवण राज्यकर्त्यांना आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

make special pkg

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.