ETV Bharat / city

'आमच्या हक्काचं पाणी द्या'; मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. यासाठी त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.

pankaja munde agitates in aurangabad
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत.
author img

By

Published : Jan 27, 2020, 3:10 PM IST

Updated : Jan 27, 2020, 3:19 PM IST

औरंगाबाद - मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषण सरकारच्या विरोधात नसून मराठवाड्यातील मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

पिण्याचे पाणी तसेच सिंचन प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण पुकारल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी सरकारवर टिका करणार नसल्याचे सांगितले. भाजप सरकारने केलेल्या कामांना नवीन सरकारने गती द्यावी, यासाठी हे उपोषण असल्याचे त्यांनी म्हटले. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

लाक्षणिक उपोषणातील मागण्या

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी अतिरिक्त एक हजार कोटी रुपये द्यावे

जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवून महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करावी. यामार्फत 11धरणे लूप पद्धतीने जोडावी.

पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी.

जायकवाडी धरणात पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून कालव्याद्वारे सिंधफणा व वाण उपखोऱ्यामध्ये सोडावे. तसेच कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा.

फडणवीस सरकारने मंजूर केलेली औरंगाबाद शहराची 1,680 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी व बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा.

Intro:मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. उपोषण सरकारच्या विरोधात नसून मराठवाड्यातील मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी असल्याच मत पंकजा मुंडे यांनी उपोषणस्थळी व्यक्त केले.

Body:पाणी, सिंचन प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण आहे. सरकारवर टिका करणार नाही, आम्ही जे काम केले त्यास सरकारने जलदगती द्यावी, यासाठी हे उपोषण आहे. ही चळवळ आहे ही फक्त सुरवात आहे. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन प्रश्न सोडवावे. राज्यातील प्रश्नावर काम करणार असे यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Conclusion:मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे, विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत, जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी, महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावीत, मराठवाड्याची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱयात आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, जायकवाडी धरणात पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून कालव्याद्वारे सिंधफणा व वाण उपखोर्यांमध्ये सोडावे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा, फडणवीस सरकारने मंजूर केलेली औरंगाबाद शहराची 1,680 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी व बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा. अश्याया मागण्या उपोषणस्थळी पंकजा मुंडे यांनी केल्या. पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
1to1
Last Updated : Jan 27, 2020, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.