ETV Bharat / city

स्व. बाळासाहेब पाटील पुराण संग्रहालयाच्या नुतनीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर - paithan

संत ज्ञानेश्वर उधाणातील स्व. बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालयाची अत्यंत दुरवस्था झाली होती. पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून १ कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती संग्रहालय प्रमुख डॉ. मधुकर कठाणे यांनी दिली.

स्व. बाळासाहेब पाटील पुराण संग्रहालय
author img

By

Published : May 18, 2019, 9:54 PM IST

औरंगाबाद - तब्बल २२ वर्षानंतर स्व. बाळासाहेब पाटील पुराण संग्रहालयाच्या नुतनीकरणासाठी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासकीय अनास्था व निधी अभावी पैठण संत ज्ञानेश्वर उधाणातील स्व. बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालयाची अत्यंत दुरवस्था झाली होती.

स्व. बाळासाहेब पाटील पुराण संग्रहालय

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात स्व. बाळासाहेब पाटील यांच्या संग्रहातील वस्तूंचे संग्रहालय राज्य शासनाने उभारले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या या संग्रहालयात २ हजार पुराण वस्तू जागेअभावी एका खोलीत आज रोजी कुलूपबंद आहेत. शासकीय अनास्था व निधी अभावी संग्रहालयाची दुरवस्था झाली होती. २२ वर्षानंतर आता संग्रहालयाच्या नुतनीकरणासाठी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून १ कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती संग्रहालय प्रमुख डॉ. मधुकर कठाणे यांनी दिली.

संग्रहालयात सातवाहनकालीन मातीच्या मुद्रा, मुद्रा घडवण्याचे दगडी साचे, टाकसाळीतील नाण्याचे खापरी साचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, विविध प्रकारची भांडी, शस्त्रे आदी नानाविध ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. पैठण येथील इतिहास संशोधक स्व. बाळासाहेब पाटील यांच्या वाड्यातील संग्रहालय १९९७ मध्ये संत ज्ञानेश्वर उद्यानात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, उद्यानातील अपुऱ्या जागेत सर्व वस्तू पाहण्यासाठी ठेवता येत नाहीत. या वस्तुसंग्रहालयासाठी संत ज्ञानेश्वर उद्यानाची पैठण औरंगाबाद रोड लगतची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. ही जागा मिळाल्यास कुलुपबंद वस्तू नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या करता येतील.

Intro:शासकीय अनास्था व निधी अभावी पैठण संत ज्ञानेश्वर उधाणातील स्व. बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालयाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तब्बल २२ वर्षानंतर आता संग्रहालयाच्या नुतनीकरणासाठी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातुन एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे संग्रहालयाला पुन्हा अच्छे दिन येणार आहेत.

Body:पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानात  स्व. बाळासाहेब पाटील यांच्या संग्रहातील वस्तूंचे संग्रहालय राज्य शासनाने उभारले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या या संग्रहालयात दोन हजार पुराणवस्तू जागेअभावी एका खोलीत आजरोजी कुलूपबंद आहेत. 
शासकीय अनास्था व निधी अभावी संग्रहालयाची दुरावस्था झाली होती. २२ वर्षानंतर आता संग्रहालयाच्या नुतनीकरणासाठी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून १ कोटी रूपयाचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती संग्रहालय प्रमुख डॉ मधुकर कठाणे यांनी दिली
पैठण च्या या संग्रहालयात सातवाहनकालीन मातीच्या मुद्रा, मुद्रा घडवण्याचे दगडी साचे, टाकसाळीतील नाण्याचे खापरी साचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, विविध प्रकारची भांडी, शस्त्रे आदीं नानाविध ऐतिहासिक व प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. पैठण येथील ईतिहास संशोधक स्व. बाळासाहेब पाटील यांच्या वाड्यातील संग्रहालय १९९७ मध्ये संत ज्ञानेश्वर उद्यानात स्थलांतरित करण्यात आले. मात्र उद्यानातील अपुऱ्या जागेत सर्व वस्तू पाहण्यासाठी ठेवता येत नाहीत, ही मुख्य अडचण आहे. या वस्तुसंग्रहालयासाठी संत ज्ञानेश्वर उद्यानाची पैठण औरंगाबाद रोड लगतची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. ही जागा मिळाल्यास कुलुपबंद वस्तू दिमाखात प्रदर्शित करता येऊ शकेल.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.