औरंगाबाद - राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटी रुग्णालयातील परिचारिका दोन दिवसांच्या ( Nurses strike in Ghati hospital ) संपावर गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत संपावर जाऊ असा इशारा यावेळी संपकरी परिचारिकांनी दिला आहे.
राज्यभरात राज्य सरकार कर्मचार्यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी ( gov employees strike for demands ) आजपासून संपाला सुरुवात झाली आहे. या संपामध्ये विविध कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी झाल्या आहेत. घाटी रुग्णालयातील शासकीय परिचारिका कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. राज्य सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे.
हेही वाचा-Kirit Somaiya On Nawab Malik ED : शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया
रुग्णालयातील सर्व परिचारिका संपात सहभागी
दोन दिवसाच्या संपात राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारादेखील यावेळी परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी इंदुमती थोरात ( Indumati Thorat on nurses strike ) यांनी दिला. घाटी रुग्णालयातील सर्व परिचारिका सहभागी झाल्याचे ( Nurses strike in Ghati hospital ) त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-Nawab Malik arrested by ED : मोठी बातमी! नवाब मलिकांना ईडीकडून अटक
या आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- नवीन पेन्शन योजना एमपीसी रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
- सर्व रिक्त पदे तात्काळ भरा.
- बक्षी समिती अहवाल खंड 2 प्रसिद्ध करा,
- सर्व भत्ते केंद्राप्रमाणे कर्मचाऱ्यांना द्या आदी मागण्यांसाठी हा संप सुरू आहे.
हेही वाचा-Kirit Somaiya On Nawab Malik ED : शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया
आमदार-खासदारांना पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना नाही
देशातील आमदार-खासदारांना पेन्शन योजना लागू ( Pension scheme for MP MLA ) आहे. दुसरीकडे कोरोना या महाभयंकर आजाराच्या परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून परिचारिका कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. या कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली, मात्र पेन्शन योजनेला अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नाही. आमदार-खासदारांना पेन्शन मिळते. तर मग स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना का नाही, असा सवालदेखील यावेळी उपस्थित करण्यात आला.
हेही वाचा-Sameer Wankhede Bar Licence Case : समीर वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यात हजर, म्हणाले...